जगदीप धनखड देशाचे 14 वे उपराष्ट्रपती; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ

जगदीप धनखड देशाचे 14 वे उपराष्ट्रपती; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ

जगदीप धनखड यांनी आज भारताचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीच्या राष्ट्रपती भारताचे निर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पदाची शपथ दिली. राष्ट्रपती पदाची शपथ घेण्यापूर्वी जगदीप धनखड यांनी आज राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. धनखड आता देशाचे 14 वे उपराष्ट्रपती बनले आहेत.

जगदीप धनखड यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री  माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

धनखड यांची 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपदी निवड झाली. त्यांनी विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा यांचा दणदणीत पराभव केला. यात धनखड यांनी 74.36 टक्के मते मिळाली आहे. 1997 पासून झालेल्या गेल्या सहा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर नजर टाकल्यास धनखड यांना सर्वाधिक मतांनी विजय मिळाला आहे.

जगदीप धनखड आज देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून घेणार शपथ

18 मे 1951 रोजी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धनखड यांनी चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्रात पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केले. 71 वर्षीय धनखड यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आहे. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या तिकिटावर ते झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून येत राजकारणात प्रवेश केला. 1990 मध्ये त्यांनी संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या राजकारणावर सुरुवातीला माजी उप पंतप्रधान देवी लाल यांचा प्रभाव होता.

विशेष म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापतीही असतात. उपराष्ट्रपतीपदी धनखड यांच्या निवडीसोबतच लोकसभा आणि राज्यसभेचे पीठासीन अधिकारी राजस्थानचे असतील.


शिवसेनेच्या घोषणेनंतरही काँग्रेसला हवंय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद

First Published on: August 11, 2022 1:18 PM
Exit mobile version