घरताज्या घडामोडीशिवसेनेच्या घोषणेनंतरही काँग्रेसला हवंय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद

शिवसेनेच्या घोषणेनंतरही काँग्रेसला हवंय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद

Subscribe

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील वाद विधानपरिषदेच्या निवडीवरून समोर येत आहे. विधानसभेत संख्याबळ जास्त असल्याने विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहेत. अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि शिवसेना उभी ठाकली आहे. काँग्रेसमधील अनेक नेते शिवसेनेवर नाराज असल्याचे दिसून आले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावा, यासाठी आजही आमचा आग्रह आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे आहे. तर विधान परिषदेत उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. आता संख्याबळ पाहता समसमान संख्या आहे, असं काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisement -

बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदावरून प्रतिक्रिया दिली आहे.काँग्रेस पक्षाला विधान परिषदेत सभागृह नेतेपदाचं, विरोधी पक्षनेतेपदाचं स्थान मिळायला हवं होतं. मात्र, चर्चा न होताच परस्पर हा निर्णय झाला आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या नावाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांसदर्भात दिलेल्या पत्राला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी मान्यता दिली असून त्यांनी दानवे यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

विधान परिषदेत शिवसेनेचे १२, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० सदस्य आहेत. विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचा सदस्य नेमावा असे पत्र उपसभापती नीलम गोर्‍हे यांना शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते पदासाठी अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. दरम्यान, शिवसेनेच्या घोषणेनंतरही काँग्रेसला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हवंय, असं निदर्शनास येत आहे.


हेही वाचा : …तर असं समजा जेवणारी चौथी व्यक्ती मोदी होती, जीएसटीवरून बाळासाहेब थोरातांची टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -