जम्मू काश्मीर: १ एप्रिलपासून सुरु होणार अमरनाथ यात्रेचे रजिस्ट्रेशन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जम्मू काश्मीर: १ एप्रिलपासून सुरु होणार अमरनाथ यात्रेचे रजिस्ट्रेशन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जम्मू काश्मीर: १ एप्रिलपासून सुरु होणार अमरनाथ यात्रेचे रजिस्ट्रेशन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जम्मू काश्मीरच्या अमरनाथ यात्रेची भाविक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाची अंबरनाथ यात्रा २८ जूनपासून सुरु होणार आहे. सध्या देशभरात कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेला जाण्याआधी भाविकांना रजिस्ट्रेश करावे लागणार आहे. अमरनाथ यात्रेचे रजिस्ट्रेशन १ एप्रिलपासून सुरु होणार आहे. २०२१ची अमरनाथ यात्रा बालटाल आणि पहलगामा या दोन मार्गांनी होणार आहे. श्री अंबरनाथ श्राइन बोर्डाचे सीईओ नीतीश्वर कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याचदा हेल्थ सर्टिफिटच्या बाबतीत फसवणूक केली जाते. त्यामुळ केवळ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील मान्यता प्राप्त असलेल्या डॉक्टर आणि मेडिकल संस्थांनी दिलेले सर्टिफिकेटच रजिस्टर बँकामध्ये स्विकारले जाणार आहे. यात्रेसाठी १५ मार्च २०२१ च्या नंतर तपासणी केलेले हेल्थ सर्टिफिकेट ग्राह्य धरले जाणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या ३१६ ब्रांच, जम्मू काश्मीर बँकेचे ९० ब्रांच आणि येस बँकेच्या ४० ब्रांचमध्ये रजिस्ट्रेशन करता येणार आहे. अमरनाथची ही यात्रा ५६ दिवसांची असून २२ ऑगस्ट २०२१ला ही यात्रा संपणार आहे.

अमरनाथ यात्रेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.shrimarnathjishrine.com या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती मिळवू शकता. अमरनाथच्या यात्रेसाठी १३ वर्षांपेक्षा कमी असलेली लहान मुले, ७५ वयापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती आणि गर्भवती महिला जाऊ शकत नाही.

अमरनाथच्या यात्रेसाठी दर आठवड्याला प्रत्येक दिवशीच्या प्रवासासाठी वेगवेगळी परमिट असणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना मदत व्हावी म्हणून परमिटचे रंग वेगवेगळे असणार आहेत. त्याचप्रमाणे जे भाविक हेलिकॉप्टरने यात्रा करतील त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन गरजेचे नाही. हेलिकॉप्टरच्या तिकिटीवर यासंबंधिती संपूर्ण माहिती आधीपासून दिलेली असणार आहे. त्यामुळे भाविकांना अमरनाथ यात्रेपूर्वी हेल्थ सर्टिफिकेट देणे बंधनकारक असणार आहे.


हेही वाचा – मोदींच्या बांग्लादेश स्वातंत्र्य सत्याग्रहाच्या वक्तव्याचा ओवेसींनी घेतला समचार

First Published on: March 28, 2021 1:05 PM
Exit mobile version