Army Helicopter Crash : उधमपूरमध्ये भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात, दोन पायलट जखमी

Army Helicopter Crash : उधमपूरमध्ये भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात, दोन पायलट जखमी

Army Helicopter Crash : उधमपूरमध्ये भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात, दोन पायलट जखमी

जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवगढ धार भागातील ग्रीनटॉप हॉटेलजवळ हा अपघात घडला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये यावेळी पायलट आणि को-पायलट असे दोन जण होते. या दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सैन्याचे अधिकारी आणि पोलीस बचावकार्यासाठी पोहोचले आहेत. य़ात जखमी झालेल्या दोन्ही पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती अधिकच गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली. यातील एका पालयटचे नाव अनुज राजपूत असल्याचे समोर आले आहे. या दोघांवर सध्या ऊधमपूर कमान रुग्णालयात उपचार सुरु आहे.

उधमपूर परिसरात जास्त धुक्यामुळे परिसरातील दृश्यमान कमी झाले होते. यामुळे सैन्याच्या एव्हिएशन हेलिकॉप्टरला जबरदस्तीनं लँडींग करण्याची वेळ आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय.

उधमपूरचे पोलीस उपनिरीक्षक सुलेमान चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळताच शिवगड धारमध्ये पोलिसांचे पथक रवाना झाले. या भागात धुक्यांच प्रमाण सर्वाधिक असल्याने दृश्यमानता कमी झाली होती. बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत दोन जखमी लष्करी जवानांना यशस्वीरित्या बाहेर काढले आहे.

खराब हवामानामुळेच लष्कराच्या या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. मात्र हे हेलिकॉप्टर कोसळले की पायलट क्रॅश-लॅंड झाले हे अद्याप समोर आलेले नाही, मात्र पायलट आणि सह पायलटला गंभीर दुखापत झाली आहे.

यापूर्वी ३ ऑगस्ट रोजी जम्मू -काश्मीरच्या कठुआ इथं रणजीत सागर धरणाजवळ भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली होती. २५४ आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रनच्या या हेलिकॉप्टरनं सकाळी १०.२० वाजता मामून कॅंटमधून उड्डाण केले. मात्र रणजीत सागर धरण परिसरात पोहचताच ते अचानक कोसळलं होतं.


First Published on: September 21, 2021 3:24 PM
Exit mobile version