घरदेश-विदेशjammu infiltration : दहशतवाद्यांची भारतात सर्वात मोठी घुसखोरी, १० दहशतवाद्यांविरोधात पॅरा कमांडोचे...

jammu infiltration : दहशतवाद्यांची भारतात सर्वात मोठी घुसखोरी, १० दहशतवाद्यांविरोधात पॅरा कमांडोचे सर्च ऑपरेशन सुरु

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळताच आता आयएसआयची ताकद वाढली आहे. याचे परिणाम आता जम्मू-काश्मीरमध्ये दिसून येत आहे. सध्याच्या घडीला जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास २०० पेक्षा अधिक दहशतवादी सक्रिय झाले आहेत. यामध्ये परदेशी आणि स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. अशातच भारताच्या उत्तर काश्मीरमध्ये गेल्या वर्षांनंतर दहशतवाद्यांची सर्वात मोठी घुसखोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारत- पाक नियंत्रण रेषेवरील उरी (बारामुल्ला) सेक्टरमध्ये गेल्या दोन दिवसांत जवळपास १० दहशतवादी घुसले आहेत. मात्र या घुसखोर दहशतवाद्याच्या आकडेवारीसंदर्भात भारतीय सैन्य़ दलाकडून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही. या परिस्थितीत उरी सेक्टरमध्ये आजही मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

घुसखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय सैन्याने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. या सर्च ऑपरेशनसाठी आता देशातील सर्वाधिक शक्तीशाली सुरक्षा यंत्रणा पॅरा कमांडोंची मदत घेतली जात आहेत. या सर्च ऑपरेशनमध्ये सावधगिरी म्हणून प्रशासनाने बारामुल्ला शहरातील विविध भागांतील इंटरनेट आणि मोबाईल सेवा पूर्णपणे बंद ठेवली आहे. जेणेकरुन हे दहशतवादी स्थानिकांच्या मदतीने किंवा त्यांना लपण्यासाठी मदत करणाऱ्या नागरिकांमध्ये कोणतीही प्रकराच्या माहितीची देवाणघेवाण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

यात रविवारी उरी सेक्टरमधील अंगूरी पोस्ट परिसरात स्वयंचलित शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या दहशतवाद्यांचा एक गट भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी जवान आणि दहशतवाद्यांमध्य़े झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला. यावर भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरमधून काश्मीरच्या घनदाट जंगलातून येणारे सर्व प्रमुख रस्ते आणि गल्ल्यांमध्ये विशेष चेकपोस्ट तयार करण्यात आली आहे. तसेच ज्या भागातून घुसखोरी झाली त्या भागाला सैन्याने घेराव घातला आहे. अधिक तपास करण्यासाठी सैन्याच्या विशेष श्वानांची मदत घेतली जात आहे. याशिवाय उरीतील संशयास्पद ठिकाणांवर आणि दहशतवाद्यांच्या जुन्या वस्त्यांमध्ये सतत खडा पहारा ठेवला जात आहे.

भारतीय सैन्य़ाच्या १५ व्य़ा कोर टीमचे कमांडर लेफ्टनंट जनरल डी.पी.पांडे यांनी उरीमध्ये सध्या दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरु असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मात्र काश्मीर खोऱ्यात आत्तापर्यंत किती दहशतवादी घुसलेत याची माहिती जाहीर केलेली नाही. परंतु स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, पाक घुसखोरांची संख्या १० इतकी आहे. त्यामुळे या परिसरात सात ते आठ वर्षांत सर्वात मोठी घुसखोरी झाली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून पाक घुसखोरांना दोनवेळा नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -