घसा खवखवला, पण कोरोना नाही तर किडा निघाला!

घसा खवखवला, पण कोरोना नाही तर किडा निघाला!

घसा खवखवला, पण कोरोना नाही तर निघाला किडा!

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना एखादी शिंक, खोकला किंवा साधा घसा जरी खवखवला तरी कोरोना तर नसेल न..? असा प्रश्न मनात आल्या शिवाय राहत नाही. मात्र जपानमधील एका महिलेचा घसा खवखवत असल्याने ती डॉक्टरांकडे गेली होती, साधारण  सर्दीसाठी तिला काही औषधांची अपेक्षा होती. मात्र औषध देण्याऐवजी डॉक्टरांनी तिच्या घसा तपासला तर तिच्या टॉन्सिल्समधून डॉक्टरांनी थेट एक किडा (Live Worm In Tonsils) बाहेर काढला.

…आणि घशात वेदना होऊ लागली

द अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजीन या पुस्तकात प्रकाशित झालेल्या एका केस स्टडीनुसार, टोकियो येथील २५ वर्षीय महिलेची नुकतीच जपानच्या राजधानीतील सेंट ल्यूकच्या आंतरराष्ट्रीय रुग्णालयात शारीरिक तपासणी झाली. तिने डॉक्टरांना सांगितले की, साशिमी खाल्ल्यानंतर तिच्या घशात वेदना आणि जळजळ जाणवत आहे. साशिमी ही एक जपानी पदार्थ आहे, ज्या पदार्थात ताज्या कच्च्या माशाचे मांस असते.

किड्याची ओळख पटली

द गार्डियनच्या मते, डॉक्टरांनी महिलेच्या डाव्या टोन्सिलपासून १.५ इंच लांबीचा आणि १ मिमी रुंदीचा एक किडा बाहेर काढल्यानंतर ही तो किडा अद्याप जिवंत होता. चिमट्याचा वापर करून महिलेच्या टॉन्सिल्समधून हा किडा बाहेर काढण्यात आला. या जंतासारख्या दिसणाऱ्या किड्याची ओळख डीएनए परीक्षणाच्या सहाय्याने करण्यात आली. हे परजीवी जंत कच्चे मांस खाणार्‍या लोकांना संक्रमित करू शकतात, असे देखील सांगण्यात आले आहे.

हा किडा चौथा टप्प्यातील जंत-अळी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. म्हणजेच या महिलेने कदाचित आपल्या साशिमी डिशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लार्वा म्हणून सेवन केले होते. सुदैवाने, हा किडा बाहेर काढण्याच्या प्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती वेगाने सुधारली.

दरम्यान ही एक वेगळी घटना नाही. सीएनएनच्या मते, ज्या देशांमध्ये कमी प्रमाणात शिजवलेले मांस किंवा सीफूडचे कच्चे खाणे साधारणपणे रोजचे असते, अशा देशांमध्ये परजीवी-दूषित अन्नामुळे होणा-या रोगांची उदाहरणे वाढत आहेत. दोन वर्षांपूर्वी, जपानमधील एका व्यक्तीला देखील चिकन शशिमी खाल्ल्यानंतर राउंडवार्म परजीवीची लागण झाली होती, मात्र तो व्यक्तीही उपचारानंतर ठिक झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.


Video : ‘माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड’ पाहताच, बायकोने भररस्त्यात केला हंगामा

First Published on: July 15, 2020 4:16 PM
Exit mobile version