लिलावात ‘या’ माश्याची किंमत ठरली २१ कोटी

लिलावात ‘या’ माश्याची किंमत ठरली २१ कोटी

जगातील सर्वात महाग मासा

मासे विकत घेताना आपण त्यांचे भाव विचारुन घेतो. मास्यांचे भाव हे निश्चित नसतात. काही मस्यप्रेमी असे असतात जे मासे घेण्यासाठी किंमतीकडे लक्ष देत नाहीत. अशाच एका मस्यप्रेमीने जगातील सर्वात महाग मासा एका लिलावात विकत घेतला आहे. जापानमध्ये “सुशी” टायकून या लिलावात हा मासा विकण्यात आला. या लिलावात या मास्याची किंमत ३३३.६ दशलक्ष येन ठरली. या मास्याचे वजन २७८ किलो (६१२ पाऊंड) असून हा जपानमधील सर्वात माहाग मासा ठरला आहे. वर्षाच्याच सुरुवातीला हा मासा विकण्यात आल्यामुळे सर्वांच लक्ष याकडे लागून राहिले आहे. स्वत:ची विशेष शैली असलेला “ट्यूना किंग” म्हणजेच कियोशी किमुरा यांनी यापूर्वीही असाच एक माहागडा मासा विकत घेतला होता. २०१३ साली त्यांनी १५५ दशलक्ष येन किमतीची बोली लावली होती. 

“ही सर्वोत्तम ट्यूना आहे. मी एक ताजे आणि रुचकर ट्यूना खरेदी करण्यास सक्षम ठरलो. विचार केलेला त्याहून याची किंमत अधिकच होती. आमचे ग्राहकही तितक्याच आवडीने हा मासा खातील अशी मी अपेक्षा करतो.” – कियोशी किमुरा

First Published on: January 6, 2019 3:22 PM
Exit mobile version