दहशतवाद्याच्या आईला दिलेले वचन भारतीय सैन्याने पाळले

दहशतवाद्याच्या आईला दिलेले वचन भारतीय सैन्याने पाळले

प्रातिनिधिक फोटो

‘मेरा वचन ही है मेरा शासन‘ हा बाहुबलीमधल्या शिवगामीदेवीचा डायलॉग अनेकांना माहित आहे. शिवगामीचा हाच डायलॉग भारतीय जवानांनी लक्षात ठेवले की काय? असा प्रकार जम्मू- काश्मीरमध्ये सोमवारी घडला आहे. एका दहशवाद्याच्या आईला दिलेले वचन भारतीय जवानाने पाळले असून दहशतवादी असूनही त्याला जीवदान दिले आहे.

वाचा- जम्मू-काश्मीरमध्ये चकमीत एक जावन शहिद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

नेमकं प्रकरण काय?

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक झाली. जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादयांवर गोळीबार केला. पण त्यातील एका दहशतवाद्याच्या आईला भारतीय सैन्याने जीवे मारणार नाही असे वचन त्याच्या आईला दिले होते. ते वचन पाळत त्याला अटक करण्यात आले पण त्याला मारले नाही. हा दहशतवादी काश्मीरचा स्थानिक रहिवासी असल्याचे देखील भारतीय सैन्यान सांगितले आहे.

हे माहित आहे का? ‘काश्मीर कालही भारतात होते, आजही आहे आणि उद्याही असणार’

कसा अडकला दहशतवादात?

सोहेल असे या दहशतवादी तरुणाचे नाव असून ४ महिन्यांपूर्वीच तो जैश- ए- मोहम्मद दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याच्या आईने आणि बहिणीने त्याला परत ये असे देखील सांगितले होते. पण तो ऐकला नाही. अखेर आईने भारतीय जवानांना माहिती दिली त्यानंतर त्याच्या प्रत्येक हालचालीवर सैन्य लक्ष देऊन होते. त्याचा तपास करत असताना त्याला मारु नका अशी विनंती त्याच्या आईने केली होती. भारतीय जवानांनी त्याला न मारण्याचे वचन दिले होते.

दुसरा दहशतवादी पाकिस्तानी ?

सोहेलसोबत असलेल्या दुसऱ्या दहशतवादयाचा खात्मा करण्यात आला. त्याचे नाव वसीम असून तो पाकिस्तानचा रहिवासी असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

First Published on: November 27, 2018 9:33 PM
Exit mobile version