Job Alert : ५वी पास ते पदवीधरांपर्यंत करू शकतात अर्ज; मुलाखतीद्वारे होणार भरती

Job Alert : ५वी पास ते पदवीधरांपर्यंत करू शकतात अर्ज; मुलाखतीद्वारे होणार भरती

नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी (For job seeking candidates) सीआरपीएफ दादरी रोड ग्रेटर नोएडा येथे मुख्याध्यापिका (Headmistress), शिक्षक (teacher) आणि आया (nanny) या पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे या पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवारांनी rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार केवळ 9 पदे भरतीद्वारे भरली जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज योग्यरित्या अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण चुकीच्या पद्धतीने भरलेला फॉर्म विभागाकडून स्वीकारला जाणार नाही आहे.

आयाच्या पदांसाठी फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीने पाचवी पास असणे आवश्यक असून शिक्षक पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी बीएडधारक असणे आवश्यक आहे. याशिवाय इतर पदांशी संबंधित पात्रता अधिकृत वेबसाइटवर तपासता येऊ शकते. वरील पदाकरीता उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे असणे गरजेचे असून भारत सरकारच्या नियमांनुसार उमेदवारांना वयातही सवलत दिली जाणार आहे.

मुख्याध्यापिका, शिक्षक आणि आया या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज भरावा लागणार आहे. हा अर्ज उमेदवारांना पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा-201306 येथे पत्राद्वारे किंवा स्वत: नेऊन द्यावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल 2023 असल्यामुळे त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांचा अर्ज स्विकारला जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी वेळेआधीच अर्ज पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

भरती प्रकियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड परीक्षा न घेता त्यांची मुलाखतीद्वारे भरती होणार आहे. यासाठी 1 मे 2023 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखतींना सकाळी 10 वाजता सुरूवात होणार असून यासाठी उमेदरावारांना 10 च्या आधी पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, दादरी, ग्रेटर नोएडा यांच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. भरतीसंबंधीत अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

First Published on: April 5, 2023 3:15 PM
Exit mobile version