केंद्राच्या टांकसाळमध्ये नोकरीची संधी; पदवी,आयटीवाल्यांना प्राधान्य

केंद्राच्या टांकसाळमध्ये नोकरीची संधी; पदवी,आयटीवाल्यांना प्राधान्य

नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारच्या टांकसाळमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आली आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी आता विविध पदांवर भरती सुरू होणार आहे. इंडियन गव्हर्नमेंटद्वारे १७ जानेवारीला या नोकऱ्यांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात एकूण ५४ पदांसाठी उमेदवार अर्ज भरले जाणार आहेत. यात ज्युनिअर ऑफिस असिस्टंट, ज्युनिअर टेक्निशिअन्स यासांरख्या पदांसाठी भरती होणार आहे. २० जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. हा अर्ज भरण्यासाठी ६०० रुपये आकारले जाणार आहे.

अर्ज कसा कराल?

इच्छुक असलेल्या उमेदवारांनी IGM- SPMC च्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन तिथे igmkolkata.spmcil.com वर अर्ज भरायचा आहे. यासाठी प्रथम IGM- SPMC च्या ऑफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर करिअर सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर २० जानेवारी २०२१ पासून सुरू होणाऱ्या फॉर्मच्या लिंकवर क्लिक करा. एक्टिव्ह झालेल्या लिंकवर उमेदवाराने आपली आवश्यक असलेली माहिती भरावी लागणार आहे.

कोणती पदे आणि किती पगार?

या नोकर भरतीत सुपवायझर पदासाठी एकूण १० जागा आहेत. यांना २६,००० ते १,००,००० रुपये पगार देण्यात येईल. इंग्रेवर पदासाठी ३ ते ६ पदे आहेत. या पदासाठी ८,५०० ते २०.८५० रुपये पगार देण्यात येईल. ज्युनिअर ऑफिस असिस्टंट पदासाठी १२ जागा आहेत. तर ज्युनिअर बुलियन असिस्टंटसाठी १० जागा आहेत. त्यांना ८,३५० ते २०,४७० रुपये पगार देण्यात येईल. ज्युनिअर टेक्निशियनसाठी एकूण १६ जागा देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ७,७५० ते १९,०४० इतका पगार देण्यात येणार आहे.

शिक्षण मर्यादा

सुपरवायझर पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे मॅकेनिकल, सिव्हिल, मेलर्जीक, इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्याचे वय १८ ते ३० वर्षे असणे गरजेचे आहे. इंग्रेवर ३ साठी फाईन आर्टमध्ये पदवी असणे गरजेचे आहे. त्यासाठी १८ ते २८ ही वयोमर्यादा असणार आहे. ज्युनिअर ऑफिस आणि ज्युनिअर बुलियन असिस्टंटसाठी कोणत्याही विषयात पदवी असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हिंदी किंवा इंग्रजीमध्ये टायपिंग येणे गरजेचे आहे. यासाठी १८ ते २८ ही वयोमर्यादा असणार आहे. ज्युनिअर टेक्निशियनसाठी इलेक्ट्रिनिक सर्टिफिकेट आणि एनएसी सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. यासाठी १८ ते २५ वर्ष वयोमर्यादा असणे दरजेचे आहे.


हेही वाचा – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 119 जागांसाठी भरती

 

First Published on: January 19, 2021 6:49 PM
Exit mobile version