COVID19 vaccine: डेल्टा व्हेरिएंट विरूद्ध Johnson & Johnson ची लस प्रभावी; कंपनीचा दावा

COVID19 vaccine: डेल्टा व्हेरिएंट विरूद्ध Johnson & Johnson ची लस प्रभावी; कंपनीचा दावा

Johnson & Johnson Vaccine

कोरोना व्हायरसचा नवीन डेल्टा प्लस हा व्हेरिएंट आता जगासाठी चिंतेचा विषय ठरतोय. डेल्टा प्लस व्हेरिएंट हे व्हायरसचे असे स्वरूप आहे जे थेट फुफ्फुसांवर हल्ला करते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या रूग्णांवर नियंत्रण मिळत असताना आता डेल्टा प्लस व्हेरियंटने पुन्हा एकदा देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. चिंतेची बाब म्हणजे डेल्टा प्लस व्हेरियंटवर कोरोनाची कोणतीही लस प्रभावी ठरत नसल्याने त्यावर वेळेत उपचार करणं शक्य होत नसल्याचे समोर आले आहे. मात्र या चिंताजनक परिस्थिती दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जॉन्सन अँड जॉनसन कंपनीची लस या व्हेरिएंटवर प्रभावी ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

नुकताच जॉन्सन अँड जॉनसन कंपनीने असा दावा केला की, त्यांची लस डेल्टा प्लस व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी आहे. तसेच यावर उपचार करण्यासाठी ही लस सक्षम असल्याचेही म्हटले आहे. कंपनीचा दावा आहे की, त्यांच्या लसीचा एक डोसच पुरेसा असून कोरोनाचा प्रभाव कमी करण्यास सक्षम आहे. त्यांची लस कोरोनाच्या या व्हेरिएंटसह कोरोनाच्या इतर प्रकारांविरूद्ध जोरदार लढा देण्यास सक्षम आहे.

हा दावा करताना कंपनीने अशी माहिती दिली की, लस घेतल्यानंतर २९ दिवसांतच डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रभाव नाहीसा ठरला आणि या लसीद्वारे मिळणारे संरक्षण कालांतराने चांगले झाले. कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने जगात कहर निर्माण केला आहे आणि हा व्हेरियंट सध्या अनेक देशांमध्ये पसरला आहे. दिवसेंदिवस हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट रुग्णांच्या संख्येत वाढ घातलाना दिसतोय.


 

First Published on: July 2, 2021 3:53 PM
Exit mobile version