घरलाईफस्टाईलमायग्रेनचा त्रास होतोय? मग व्यायमासह आहारात करा या पदार्थांचा समावेश.....

मायग्रेनचा त्रास होतोय? मग व्यायमासह आहारात करा या पदार्थांचा समावेश…..

Subscribe

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या काळजी आणि चिंताचे रूपांतर शारिरक दुखण्यात कधी होते हे माणसाला कळतही नाही. आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या वाढू लागली आहे. सतत होणारी ही डोकेदुखी अचानक मायग्रेनचं (migraine) रूप धारण करू लागली आहे. मायग्रेन ही एक न्युरॉलॉजिकल आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये तुमच्या डोक्याची अर्धी बाजू दुखू लागते. कधी कधी मायग्रेनमुळे उलटीचाही त्रास जाणवतो. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसते.

आजकाल धावपळीच्या जगात ताण -तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या अडचणींमुळे काळजी आणि चिंता वाढत आहे. परंतु सतत वाढणारी काळजी कधी आजारात रुपातंर हे कळत सुद्धा नाही. आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या वाढत आहे. परंतु सतत वाढणारी डोकेदुखी अचानक मायग्रेनचं रुप धारण करत आहे. मायग्रेन ही एक न्युरॉलॉजिकल आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये तुमच्या डोक्याची अर्धी बाजू दुखू लागते. ही वेदना काही मिनिटांपासून काही दिवसांपर्यंत चालू राहते.

- Advertisement -

या आजारात डोकेदुखी व्यतिरिक्त, मळमळ, डोळे आणि कान मागे वेदना अशा अनेक समस्या जाणवतात. परंतु बहुतांश लोक मायग्रेन या आजाराला गांभीर्याने घेत न घेता वेदना कमी करण्यासाठी पेन किलरच्या गोळ्यांचे सेवन करतात. परंतु मायग्रेन या आजारावर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करू नये. प्रत्येक डोकेदुखी मायग्रेन असेलच असे मुळीच नाही. शिवाय प्रत्येक व्यक्तीमधील मायग्रेनच्या त्रासाचे कारण निरनिराळे असू शकते. मायग्रेन एक अनुवंशिक समस्या आहे. मायग्रेनचा त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो.

परंतु काही घरगुती उपाचार करुनही मायग्रेनच्या वेदना कमी करु शकतात. एका नव्या अभ्यासानुसार, आहारात एखाद्या खास पदार्थ्यांचा समावेश करत तुम्ही मायग्रेनचा त्रास कमी करु शकता. ओमेगा-३ फॅटी अॅसिडने मायग्रेनची समस्या सर्वाधिक कमी करण्यास मदत होते. विशेषत: तरुण स्त्रियांमध्ये ओमेगा-३ अॅसिडचा बराच परिणाम दिसून येतो.

- Advertisement -

ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, हाय ओमेगा ३ डाइटमुळे दोन ते चार महिन्यातचं तुमची डोकेदुखी कायमची कमी होईल. ऑयली फिश आणि फॅटी अॅसिड सप्लिमेंटमध्ये मोठ्याप्रमाणातओमेगा ३ असते. हे ओमेगा ३ ह्रदयासाठी देखील खूप उपयुक्त आहे.

या संशोधनात १८२ लोकांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये ८८ टक्के महिला होत्या. सरासरी ३८ वय वर्षाच्या या महिलांना महिन्यातून ५ ते २० वेळा मायग्रेनचा त्रास व्हायचा. त्यामुळे या महिलांचे तीन वेगवेगळ्या गटात विभाजन करण्यात आले. तसेच डाइटच्या हिशोबाने त्यांना ओमेगा-३ फॅटी अॅसिट वेगवेगळ्या प्रमाण देण्यात आले.

संशोधनात सहभागी लोकांना माशांसोबत तेल, बटर, प्रथिनेयुक्त फूड देण्यात आले. यानंतर, त्यांचे इलेक्ट्रिकल डायरीद्वारे मायग्रेनची फ्रिक्वेंसी चेक करण्यात आले. संशोधनात ज्या लोकांनी दिवसाला १.५ ग्रॅम हाय ओमेगा ३ डाइट घेतले. त्यांना दरमहा वारंवार होणारी डोकेदुखी दुप्पट कमी झाली. तर दुसरीकडे, हाय ओमेगा ३ आणि कमी ओमेगा ६ डाइट घेणाऱ्या स्त्रियांना महिन्यातून चार दिवस कमी डोकेदुखीचा त्रास होत होता.

‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

या मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी आहारात अधिक प्रमाणात लिक्विडचा समावेश करा. जसे की सूप, लिंबू पाणी, दालचिनी, द्राक्षाचा रस, आले, पालक आणि गाजराचा रस, सफरचंद ताक, लस्सी, नारळपाणी समावेश करा. तसेच आहारातील मीठाचे प्रमाण कमी करा. डाएटमध्ये फळ आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा.

‘हे’ पदार्थ खाणे टाळा

चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. अधिक प्रमाणात तळलेले पदार्थ खाऊ नका.. मायग्रेन असेल तर उपवास करणे टाळा. तसेच चीज, प्रक्रीया केलेले पदार्थ, चमचमीत पदार्थ खाण्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकते. हवाबंद केलेले पदार्थ खाणे टाळा. पिझा, बर्गर, भटुरे आणि कुकीजसारखे पदार्थ खाण्यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो.

योगासने करा

बायोफिडबॅक, एक्युप्रेशर, योगासने आणि मेडीटेशनमुळे मन शांत राहण्यास मदत होते. जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे योगासने आणि प्राणायमाचा सराव करा. शिवाय झोपताना अथवा झोपण्यापूर्वी फक्त दहा मिनीटे केलेल्या मेडीटेशनमुळे तुम्हाला निवांत वाटू लागेल. यासाठी ही काही योगासने अवश्य करा. जोरात आवाज किंवा ताण-तणाव असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळा.


Covid vaccine आणि Test Report आता मोबाईलमध्येच होईल सेव्ह, गुगलचं नवं फिचर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -