जुलेन लोपेतेग्यूई रिअल माद्रिदचे नवे कोच

जुलेन लोपेतेग्यूई रिअल माद्रिदचे नवे कोच

जुलेन लोपेतेग्यूई

माजी स्पॅनिश फुटबॉलपटू आणि सध्याचे स्पेन नॅशनल टीमचे कोच जुलेन लोपेतेग्यूई यांची रिअल माद्रिदचे कोच म्हणून निवड झाली आहे. रिअल माद्रिद फुटबॉल संघाचे होमग्राऊंड बेर्नाबेऊ स्टेडियम येथे त्यांनी नुकताच ३ वर्षांचा करार केला आहे. जुलेन यांचा रिअल माद्रिद क्लबशी दीर्घकाळ संबंध आहे. २००८ ते २००९ दरम्यान ते रिअल माद्रिद ब संघाकडूनही खेळले होते.

विश्वचषक स्पर्धेनंतर करणार मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रवेश

यावेळी रिअल माद्रिद क्लबने निवेदनात म्हटले आहे की, “पुढील तीन हंगामांसाठी जुलेन लोपेतेग्यूई संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पहाणार आहेत. विश्वचषक स्पर्धेत स्पेनच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केल्यावर, जुलेन लोपेतेग्यूई क्लबचे प्रशिक्षक म्हणून काम करतील.”

झिदानला करणार बदली

४५ वर्षीय झिदान यांनी २०१६ मध्ये ‘रिअल माद्रिद’च्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतली. यावेळी १४९ पैकी १०४ सामने त्यांनी जिंकवले आहेत. तर फक्त १६ सामन्यांत त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. वाढत चाललेल्या दबावामुळे झिदान राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. अखेर चॅम्पियन्स लीगच्या फायनलनंतर पाच दिवसांनी ३१ मे रोजी त्यांनी राजीनामा दिला.

माजा प्रशिक्षक झिदान

जुलेनवर असणार मोठी कामगिरी

५१ वर्षीय जुलेन यांच्यावर सलग तीन वेळा चॅम्पियन्स लीगमध्ये विजेतेपद पटकावलेल्या संघाला प्रशिक्षण देण्याची मोठी जबाबदारी आहे. यासोबतच जागतिक फुटबॉलमधील काही मोठ्या प्रतिभावान खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे आवाहन आहे. यात ख्रिस्तियानो रोनाल्डो, करिम बेंझेमा, गॅरेथ बेल यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

गॅरेथ बेल, रोनाल्डो, करिम बेंझेमा.
First Published on: June 14, 2018 6:11 AM
Exit mobile version