देशात जुलैमध्ये 1.49 लाख कोटींचे रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन

देशात जुलैमध्ये 1.49 लाख कोटींचे रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन

देशात जुलैमध्ये सलग पाचव्या महिन्यात 1.4 लाख कोटी रुपयांच्यावर रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन झाले आहे. जुलै 2022 मध्ये एकूण जीएसटी महसूल 1,48,995 कोटी रुपये होता, जो वस्तू आणि सेवा कर ( जीएसटी) लागू झाल्यापासून ते आत्तापर्यंतचा दुसरा उच्चांक आहे. सरकारने सोमवारी जाहीरप केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमधील महसुलाचा आकडा गेल्या वर्षींच्या या महिन्यात 1,16,393 कोटी रुपयांच्या महसुलापेक्षा 28 टक्के जास्त आहे.

एकूण आकडेवारीपैकी सीजीएसटी 25,751 कोटी रुपये इतका आहे. त्याचवेळी एसजीएसटी 32, 807 कोटी रुपये आहे. तर आयजीएसटी 79,518 कोटी आहे. (माल आयातीवर गोळा केलेल्या रु.41,420 कोटींसह) आणि उपकर 10,920 कोटी आहे. (माल आयातीवर गोळा केलेल्या रु. 995 कोटींसह). या महिन्यात वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 48 टक्क्यांनी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळालेला महसूल हा मागील वर्षांच्या याच महिन्यातील या स्त्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 22 टक्क्यांनी जास्त होता.

वित्त मंत्रालयाने सांगितले की, सलग पाच महिन्यांपासून महिन्याला गोळा होणारा जीएसटी महसूल 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, जो दर महिन्यात सतत वाढत आहे. जुलै 2022 पर्यंत जीएसटी महसूल मागील वर्षांच्या तुलनेत 35 टक्क्यांनी वाढला आहे. ज्यात मोठी वाढ दिसत आहे. अधिक चांगल्या प्रकारे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी परिषदेने यापूर्वी केलेल्या विविध उपाययोजनांचा हा स्पष्ट परिणाम आहे. आर्थिक सुधारणांसह सुधारित अहवालाचा जीएसटी महसुलावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

सरकारने आयजीएसटीमधून 32,365 कोटी रुपये सीजीएसटी आणि 26,774 कोटी एसजीएसटी गोळा केला आहे. नियमित सेटलमेंटनंतर जुलै 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसुल सीजीएसटीसाठी 58,116 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 59,581 कोटी रुपये आहे.

जीएसटीने प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, जून 2022 च्या महिन्यात 7.45 कोटी ई-वे बिल ( ई- वे बिल सिस्टीम जीएसटी नोंदणीकृत व्यक्ती- नोंदणी केलेल्या ट्रान्सपोर्टरसाठी आहे.) जमा करण्यात आले होते. जे मे 2022 मधील 7.36 कोटीपेक्षा किंचित जास्त होते. त्याचवेळी यावर्षी एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपयांच्या उच्चाकावर पोहचला आहे. जीएसटी संकलनाने 1.50 लाख कोटींचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.


संजय राऊत शरद पवारांचे प्यादं होतं, त्याच काम आता संपलं; संजय शिरसाटांचा घणाघात

First Published on: August 1, 2022 3:19 PM
Exit mobile version