ज्योतिरादित्य आज भाजपमध्ये प्रवेश करणार

ज्योतिरादित्य आज भाजपमध्ये प्रवेश करणार

मध्य प्रदेशातील राजकारण आता वेगळे वळण घेऊ लागले आहे. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ज्योतिरादित्य यांच्यासोबत २२ आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी टि्वट करत मध्य प्रदेशमधील सरकार पाडण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे.

ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसवर मोठे संकट कोसळे आहे. ज्योतिरादित्य यांच्यासोबत २२ आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ यांच्या सरकारवर टांगती तलवार आहे. मात्र, कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आहे हे कमलनाथ यांनी मान्य केलेले नाही.


हेही वाचा – CORONA VIRUS: ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांना करोनाची लागण

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आमदारांची समजूत काढण्याची जबाबदारी त्यांचे विश्वासू सहकारी सज्जनसिंह वर्मा यांच्याकडे दिली आहे. राजीनामे दिलेल्या सर्व आमदारांची समजूत काढली गेली नाही तर, कमलनाथ यांचे सरकार कोसळू शकते.

First Published on: March 11, 2020 12:45 PM
Exit mobile version