कर्नाटकच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; पण लक्ष राहुल गांधींच्या प्रचार सभेकडे, कारण…

कर्नाटकच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; पण लक्ष राहुल गांधींच्या प्रचार सभेकडे, कारण…

संग्रहित छायाचित्र

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची (Karnatak Assembly Election 2023) घोषणा करण्यात आली आहे. 10 मे ला 224 जागांसाठी या राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी राज्यातील सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पण या निवडणुकीत सर्वांचे लक्ष हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सभेकडे लागले आहे, कारण राहुल गांधी हे त्याच ठिकाणाहून प्रचाराला सुरूवात करणार आहेत, जिथे त्यांनी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. 10 मे ला कर्नाटक राज्यातील 224 विधानसभेच्या जागांसाठी हे मतदान घेण्यात येणार आहे. तर लगेच 13 मे ला निवडणुकांचे निकाल देखील हाती येणार आहेत. यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून निवडणुकांची घोषणा होताच तयारीला देखील लागले आहेत.

भाजप आणि काँग्रेसमध्ये कर्नाटकमधील लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) हे प्रचार सभेत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून नेते राहुल गांधी हे देखील लवकरच प्रचाराला सुरूवात करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

राहुल गांधी हे त्याच ठिकाणाहून प्रचाराला सुरूवात करणार आहेत, ज्याठिकाणाहून त्यांनी 2019 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना आपली खालसदारकी गमवावी लागली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या या सभेकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. 2019 च्या कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी कोलार येथे केलेल्या भाषणामध्ये सर्व चोरांची आडनावे मोदी कशी आहेत? असे वक्तव्य केले होते. ज्यानंतर मागील आठवड्यात 23 मार्चला सुरतच्या जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांना या विधानाप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधी यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली आहे.


हेही वाचा – कर्नाटकात निवडणुकीचं बिगूल वाजलं; १० मेला मतदान, एकाच टप्प्यात होणार निवडणूक

First Published on: March 29, 2023 5:48 PM
Exit mobile version