घरदेश-विदेशकर्नाटकात निवडणुकीचं बिगूल वाजलं; १० मेला मतदान, एकाच टप्प्यात होणार निवडणूक

कर्नाटकात निवडणुकीचं बिगूल वाजलं; १० मेला मतदान, एकाच टप्प्यात होणार निवडणूक

Subscribe

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज कर्नाटकातील निवडणुकीची माहिती दिली. त्यानुसार, १० मे रोजी कर्नाटकात मतदानप्रक्रिया पार पडणार असून १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. भ्रष्टाचार, सामाजिक तणाव, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, आरक्षण वाद या मुद्द्यांवर कर्नाटक विधानसभा निवडणूक गाजणार आहे.

निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकातील मतदानाविषयी माहिती दिली. त्यानुसार, ३० एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार आहे. २० एप्रिलपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. तर, २४ एप्रिलपर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत. तर, १० मे रोजी एका टप्प्यात निवडणुका पार पडणार असून १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी कर्नाटकातील एकूण 224 विधानसभा जागांसाठी 58,282 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 883 मतदार असतील. एवढेच नाही तर 1320 मतदान केंद्रांचे व्यवस्थापन महिला अधिकारी करतील. यावेळी आयोगाने कर्नाटकात 240 मॉडेल मतदान केंद्रे स्थापन करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

कर्नाटकात नवीन मतदार जोडण्याचे लक्ष्य असल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. मात्र, वृद्ध मतदारांसाठीही सोय करण्यात आली आहे. ते म्हणाले की, 80 वर्षांवरील व्यक्ती घरबसल्या मतदान करू शकणार आहेत. राजीव कुमार म्हणाले की, राज्यात 18 ते 19 वयोगटातील 9,17,241 मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. एवढेच नाही तर 17 वर्षे वयोगटातील 1,25,406 तरुणांनी आगाऊ अर्ज देऊन मतदार यादीत नाव नोंदवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -