कुमारस्वामींनी पत्करली हार; भाजपाला सत्तास्थापनेचे दिले निमंत्रण?

कुमारस्वामींनी पत्करली हार; भाजपाला सत्तास्थापनेचे दिले निमंत्रण?

कुमारस्वामींनी पत्करली हार

कर्नाटकातील कुमारस्वामींचे सरकार संकटात आले असून गुरुवारी विधानसभेत ते विश्वासदर्शक ठराव मांडणार होते. त्यामुळे कालचा दिवस कुमारस्वामी यांच्या सरकारसाठी खुपच महत्त्वाचा होता. सरकारला विधानसभेत त्यांचे बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र, गुरुवारी त्यांनी आपला विश्वासदर्शक ठराव मांडला नाही. त्यामुळे आता त्यांना आज सायंकाळी ६ वाजेपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. १५ बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे त्यांचे सरकार अल्पमतात गेले आहे. मात्र, कुमारस्वामींनी बहुमत चाचणी घेण्याआधीच हार पत्करल्याचे संकेत दिले असून भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. अशाप्रकारे कर्नाटकातील राजकीय नाट्याचा दुसरा अध्याही संपला आहे.

कुमारस्वामी सरकारचं भवितव्य ठरणार?

कर्नाटकातील कुमारस्वामींचे भवितव्य आज ठरणार असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत कुमारस्वामींना बहुमत सिद्ध कराव लागणार आहे. राज्यपालांनी कुमारस्वामींना तिसरा अल्टीमेटम दिला असून त्यांच आज भवितव्य ठरणार आहे. 

भाजपा, चला चर्चा करूया

आमचे सरकार १४ महिन्यांनंतर अंतिम पायरीवर पोहोचले असून जेडीएसकाँग्रेसचे सरकार बनल्यापासूनच ते पाडण्यासाठी वातावरण बनविण्यात आले. मी कोणासमोर हात जोडणार नाही. मात्र, देवाला आजही हात जोडून विचारेन की अशा परिस्थितीमध्ये मला मुख्यमंत्री का बनविले? मी कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. भाजपा, चला चर्चा करूया. तुम्ही आताही सरकार बनवू शकता. बहुमताचा आकडा असेल तर घाई कशाला. तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारीही सरकार बनवू शकता. मी सत्तेचा दुरुपयोग करणार नाही. यानंतर भाजपाचे राज्याचे अध्यक्ष बी एस येडीयुराप्पा यांनी त्यांचा पक्ष यावर राष्ट्रीय नेतृत्वासोबत विचार करून पुढील कार्यक्रम आखेल. राज्यपालांनी कुमारस्वामींना दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते.

आमदारांना ४० ते ५० कोटी रुपयांचे आमिष

काँग्रेस- जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांनी राजीनामा दिला असून दोन माजी मंत्री आणि अपक्ष आमदारही भारतीय जनता पक्षास समर्थन देण्यास तयार आहेत. त्यामुळे नैतिक दृष्ट्या काँग्रेस- जेडीएस आघाडी सरकारने बहुमत गमविले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कुमस्वामींनी भाजपाला पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच आमच्या आमदारांना ४० ते ५० कोटी रुपयांचे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आमच्या पक्षाचे आमदार श्रीनिवास गौडा यांना भाजपाने सरकार पाडण्यासाठी पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.


हेही वाचा – कुमारस्वामी सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध करावे – प्रल्हाद जोशी


 

First Published on: July 19, 2019 4:14 PM
Exit mobile version