Karnataka CM सिद्धरामय्या, DCM डी.के. शिवकुमार; KC वेणुगोपाल यांची घोषणा

Karnataka CM सिद्धरामय्या, DCM डी.के. शिवकुमार; KC वेणुगोपाल यांची घोषणा

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यासंदर्भात मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून चुरस सुरू होती. यावेळी दिल्लीत बैठका देखील घेण्यात आल्या होत्या. मात्र, आज काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची घोषणा केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सिद्धरामय्या सांभाळणार आहेत. तर उपमुख्यमंत्री पदाची धुरा डी.के.शिवकुमार हाती घेणार आहेत. त्याचप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकींपर्यंत ते प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देखील खांद्यावर घेणार आहेत.

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासोबत सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात दिल्लीत बैठका पार पडल्या. या बैठकीत कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांची निवड झाल्यानंतर काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष साजरा केला.

कर्नाटक निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राजकीय वर्तुळात जी चर्चा होती, ती अखेर खरी ठरली. मुख्यमंत्रिपदाच्या दोन प्रबळ दावेदारांवर आणि दीर्घकाळ चाललेल्या वादानंतर सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदावरील सस्पेंस आता संपला आहे. सिद्धरामय्या येत्या 20 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागणार आहे.

कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज सायंकाळी ७ वाजता बंगळुरूमध्ये बैठक पार पडणार आहे. आमदारांना या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आलं आहे.


हेही वाचा : कर्नाटकात सिद्धरामय्याच किंग; CM पदाच्या शर्यतीत हे मुद्दे ठरले डी.के. शिवकुमार यांच्यावर भारी


 

First Published on: May 18, 2023 12:27 PM
Exit mobile version