‘नशीब हे बलात्कारासारखं असतं’; काँग्रेस खासदाराच्या पत्नीचे आक्षेपार्ह पोस्ट

‘नशीब हे बलात्कारासारखं असतं’; काँग्रेस खासदाराच्या पत्नीचे आक्षेपार्ह पोस्ट

केरळचे काँग्रेस खासदार हिबी ईडन यांच्या पत्नी अन्ना ईडन

‘नशिब हे बलात्कारसारखं असतं. जर तुम्ही त्याला रोखू शकत नसाल तर त्याची मज्जा घेण्याचा प्रयत्न करा’, असं वक्तव्य केरळचे काँग्रेस खासदार हिबी ईडन यांच्या पत्नी अन्ना ईडन यांनी फेसबुकवर केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन नेटीझन्सनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं आहे. बलात्कार सारख्या संवेदनशील विषयावर अशाप्रकारे बोलणं योग्य नसल्याचं सर्वसामान्यांकडून बोललं जात आहे. त्याचबरोबर खासदार सारख्या पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीन सोशल मीडियावर अशाप्रकारचं व्यक्त करणं चिंतेची बाब असल्याचे देखील काही फेसबुक युजर्सनं म्हटलं आहे. दरम्यान, लोकांकडून होणाऱ्या टीकेमुळे अन्ना ईडन यांनी अखेर आपल्या फेसबुकवर वॉलवरुन ती पोस्ट डिलीट केली आहे. मात्र, तरीही या पोस्टचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेमकं काय होतं अन्ना ईडन यांच्या पोस्टमध्ये?

अन्ना ईडन यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये दोन व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यातील एक व्हिडिओ हा सिज्लरचा आनंद लुटण्या संदर्भात तर दुसरा व्हिडिओ त्यांच्या मुलासंदर्भात होता. या दोन्ही व्हिडिओंना त्यांनी ‘नशिब हे बलात्कारसारखं असतं. तुम्ही त्याला रोखू शकत नाहीत. त्यामुळे मज्जा घ्यायचा प्रयत्न करा’, असं कॅप्शन दिलं होतं. त्यांच्या याच पोस्टवरुन फेसबुक युजर्सनी त्यांच्यावर टीका केली.

कोण आहेत अन्ना ईडन?

अन्ना ईडन या केरळचे काँग्रेस खासदार हिबी ईडन यांच्या पत्नी आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढवली होती. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिबी ईडन यांचा एर्नाकुलम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा विजय झाला होता.


हेही वाचा – चेंबुरमध्ये रास्ता रोको आंदोलन चिघळले; पोलिसांवर दगडफेक

First Published on: October 22, 2019 6:53 PM
Exit mobile version