कुलभूषण जाधव यांचा पुनर्विचार याचिकेला नकार? पाकिस्तानचा दावा

कुलभूषण जाधव यांचा पुनर्विचार याचिकेला नकार? पाकिस्तानचा दावा

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाध यांनी आपल्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी जाधव यांना पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. त्यावेली जाधव यांनी त्यास नकार दिला. तसेच त्यांना दुसरा कॉन्सुलर Acces देण्याचा प्रस्ताव दिला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथे पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने अटक केली होती. जाधव ‘रॉ’साठी काम करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरीच्या आरोपाखाली त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेनंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयातदाद मागितली. प्रसिद्ध विधिज्ञ हरिष साळवे यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होता कामा नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

First Published on: July 8, 2020 5:12 PM
Exit mobile version