अगोदर देशातील दहशतवाद संपवा – कुमारस्वामी

अगोदर देशातील दहशतवाद संपवा – कुमारस्वामी

मोदी सरकारने अगोदर देशातील दहशतवाद संपवावा, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले आहेत. कुमारस्वामी यांनी पुलवामा हल्ल्या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारला लक्ष केले.

गुरुवारी पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या हल्ल्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या हल्ल्यावर कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या देशभरातून या हल्ल्याचा ‘बदला घ्या’ अशी आरोळी दिली जात असताना कुमारस्वामी यांनी अगोदर देशातील दहशतवाद संपवावा, असे मोदींना उद्धेशून म्हटले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला घडल्यानंतर देशातील सर्व राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा निषेध करत हल्ल्याच्या विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारला आपला पाठिंबा दर्शवला आहे. परंतु, कुमारस्वामींनी मोदींवर निशाना साधत देशातील दहशतवाद संपवण्याचा सल्ला मोदी सरकारला दिला आहे.

नेमकं काय म्हणाले कुमारस्वामी?

कुमारस्वामी यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एकीकडे दहशतवादा विरोधात मोहीम राबवली जात आहे. तर दुसरीकडे कुमारस्वामी अशाप्रकारचे वक्तव्ये करुन दहशतवादाविरोधातील लढाईला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, ‘पाकिस्तानला चोख उत्तर दिल्यानं या घटनेचं दु:ख कमी होणार नाही. अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य ते पाऊल सरकारने उचलले पाहीजेत. त्यासाठी सरकारने अगोदर आपल्या देशातील दहशतवाद्य संपवायला हवा.’


हेही वाचा – कुमारस्वामींनी शब्द पाळला! कर्नाटकातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी

First Published on: February 19, 2019 3:07 PM
Exit mobile version