डेटा लीकची धमकी देणारी ‘ती’ पुन्हा कामावर रूजू; २० कोटींची केली होती मागणी

डेटा लीकची धमकी देणारी ‘ती’ पुन्हा कामावर रूजू; २० कोटींची केली होती मागणी

डेटा लीकची धमकी देणारी 'ती' पुन्हा कामावर रूजू; २० कोटींची केली होती मागणी

टाईम्स इंटरनेट आणि केर्न इंडियामध्ये बिझनेस ऑपरेशन मॅनेजर तसेच, कॉर्पोरेट ऑफिसर म्हणून काम केलेल्या सोनिया धवन जानेवारी २०१० मध्ये पेटीएममध्ये काम करण्यास रूजू झाली होती. सोनिया धवन ही महिला पेटीएममध्ये गेल्या सात वर्षांपासून काम करत होती. सात वर्षांत तिला मिळणारा पगार ७ लाखांपासून ८५ लाखांपर्यंत पोहोचला होता. सोनिया पेटीएमचे संस्थापक असणाऱ्या विजय शेखर शर्मा यांची सेक्रेटरी म्हणून काम पाहत होती.

२० कोटी रुपये मागितल्याचा आरोप

या दरम्यान, डिजीटल ट्रान्झॅक्शनमधील मोठी कंपनी असलेल्या ‘पेटीएम’मध्ये ब्लॅकमेलिंगचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले होते. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना त्यांची खासगी माहिती उघड करण्याची धमकी देत २० कोटी रूपयांची मागणी केल्याने आता सोनिया धवनला पोलिसांनी अटक केली होती. त्या नंतर जामिनावर तिची सुटका करण्यात आली होती. सोनिया धवनवर मित्र देवेंद्र कुमार आणि पती रूपक जैन यांच्या मदतीने पेटीएमच्या संस्थापकांना डेटा लीक करण्याची धमकी दिल्याचा, तसेच त्यांच्याकडे २० कोटी रुपये मागितल्याचा आरोप आहे. या आरोपाखाली सोनिया सोबत देवेंद्र आणि रुपक अशा दोन मित्रांनाही अटक करण्यात आली होती.

पेटीएमच्या संस्थापकांना ब्लॅकमेल

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना ब्लॅकमेल करणारी सोनिया धवन पुन्हा कामावर हजर झाली आहे.  याबद्दल सोनियाने सांगितले की, मला माहिती नाही नेमके काय झाले? परंतु, या बाबत विजय शेखर यांनी उत्तर द्यावे. यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या समोर आल्या नाहीत. एक व्यक्ती फोन करून विजय शर्मा यांना डेटा लीकची धमकी देत २० कोटी रूपयांची मागणी करत होता. यादरम्यान, सोनिया ही विजय शेखर यांना सतत सांगत होती की, त्या व्यक्तीला २० कोटी रूपये देऊन टाका, नाहीतर तो तुमचा डेटा लीक करेल. पण हा डेटा सोनिया धवननेच लीक केला होता आणि तिनेच दुसऱ्या व्यक्तीद्वारे फोन करून पेटीएमच्या संस्थापकांना ब्लॅकमेल केल्याचे उघड झाले. अशी माहिती केलेल्या प्राथमिक तपासानुसार समोर आली आहे.

First Published on: March 28, 2019 2:40 PM
Exit mobile version