Amphan Cyclone Live: अम्फान वादळ ‘सुपर सायक्लॉन’मध्ये बदलण्याची शक्यता

Amphan Cyclone Live: अम्फान वादळ ‘सुपर सायक्लॉन’मध्ये बदलण्याची शक्यता

अम्फान चक्रीवादळ आज दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्व भारतीय सागरी किनाऱ्याला धडकू शकते, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत हे वादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पोहोचेल. वादळापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्व यंत्रणा सजग झाली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाली चार वाजता गृह मंत्रालय आणि एनडीएमए सोबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत अम्फान चक्रीवादळापासून वाचण्यासाठी उपाययोजनांची ते माहिती घेतली. भारतीय हवामान विभाग (IMD) ने इशारा दिला आहे की, बंगालच्या खाडीत उसळलेलं अम्फन चक्रीवादळ हे अत्यंत भीषण चक्रवादळाचे स्वरुप घेऊ शकते. पुढच्या १२ तासात अम्फान सुपर सायक्लॉनमध्ये बदलू शकते. यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

First Published on: May 20, 2020 9:47 AM
Exit mobile version