Live Update: पॅन कार्ड क्लब गुंतवणूकदार राज ठाकरे यांच्या भेटीला

Live Update: पॅन कार्ड क्लब गुंतवणूकदार राज ठाकरे यांच्या भेटीला
पॅन कार्ड क्लब गुंतवणूकदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली आहे. गुंतवणूक केलेले पैसे परत मिळावे यासाठी राज ठाकरे यांच्याकडे गाऱ्हाणं घातलं आहे. लवकरच चर्चा करून यावर मार्ग काढण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी गुंतवणूकदारांना दिलं आहे.
भाजप खासदार रीटा बहुगुणांच्या नातीचा फटाक्यांमुळे मृत्यू झाला आहे. फटाके फोडताना कपड्याने पेट घेतल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत.
पदवीधर निवडणुकीचे तिकीट न मिळाल्यामुळे माजी खासदार जयसिंग गायकवाड यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे समोर येत आहे.
आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन आहे. या निमित्ताने अनेक नेते मंडळी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिवतीर्थावर पोहोचले असून त्यांना बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.
नाशिक महापौर सतीश कुलकर्णी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे उपचाराकरिता त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत २९ हजार १६४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४४९ रुग्णांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ८८ लाख ७४ हजार २९१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३० हजार ५१९ जणांचा मृत्यू झाला असून ८२ लाख ९० हजार ३७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ४ लाख ५३ हजार ४०१ जणांवर उपचार सुरू आहेत.
 
जगातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. वर्ल्डोमीटरनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ५ कोटी ५३ लाख ४४ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १३ लाख ३२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ८४ लाख ८९ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाची लस कधी येईल, याची कोणतीही निश्चित माहिती नसताना देशभरातली आणि राज्यातलीही आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. याच प्रयत्नांचं फळ म्हणून राज्यात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात राज्याचा Recovery Rate आता ९२.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यासाठी ही सकारात्मक बातमी असून आरोग्य यंत्रणेचं धैर्य वाढवणारी आहे. सविस्तर वाचा
First Published on: November 17, 2020 12:25 PM
Exit mobile version