ये सब पापी पेट के लिये!, १ हजार किमी पायी तुडवतो तो पोहोचला पटनाला!

ये सब पापी पेट के लिये!, १ हजार किमी पायी तुडवतो तो पोहोचला पटनाला!

ये सब पापी पेट के लिये!, १ हजार किमी पायी तुडवतो तो पोहचला पटनाला!

लॉकडाऊनमुळे सध्या अडकलेल्या मजुरांविषयी अनेक वेदना देणाऱ्या गोष्टी समोर येत आहे. अशी एक घटना घडली आहे. एका व्यक्तीने पोटातली भूक आणि तुटलेल्या पायाच्या वेदना सहन करून चक्क एक किंवा दोन किलोमीटर नाहीतर एक हजार किलोमीटर सायकलवरून प्रवास केला. या प्रवासादरम्यान कधी कधी हा व्यक्ती वाटेत पडला आणि त्यामुळे त्याला पायाचे दुखणे असह्य झाले होते. या व्यक्तीच्या पायाला अजूनही प्लास्टर आहे. तरी देखील त्याने एवढ्या लांबचा पल्ला गाठला.

हा व्यक्ती बिहार मधील किशनगंज या गावातील आहे. त्याचे नाव नाझिर असे आहे. हा नाझिर पाच दिवसात सायकलवरून पटनाला पोहोचला. शुक्रवारी तो मिठापूर बस स्थानकात बस मिळले या आशेने गेला होता. मात्र तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी सांगितले की, तुम्हाला जाण्यासाठी इथून कोणतेही वाहन नाही. मग त्यावेळेस त्याने रस्त्यावरून येणा-जाणाऱ्या ट्रक चालकांना विनवणी करण्यास सुरुवात केली. मात्र कोणीही मदत न केल्यामुळे नाझिर आपली सायकल घेऊन पुढच्या प्रवाला निघाला.

छत्तीसगडमधील बलरामपूरमध्ये नाझिर काम करत होता. त्यांने सांगितले की, मजूरीचे काम करताना तो छतावरून खाली पडला. मग त्याला १५ दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. गावकऱ्यांच्या आणि पुतण्याच्या मदतीने एक वेळचे जेवण मिळत होते. पण गावातील लोक किती वेळ मदत करतील. नंतरला कधी-कधीच जेवण मिळू लागले. त्यानंतर लॉकडाऊन वाढवण्यात आला. त्यामुळे आम्हाला हा मार्ग स्विकारावा लागला.


हेही वाचा – CoronaVirus: चीनमधील वुहान शहरातून कोरोना व्हायरस पसरला, WHOने केले मान्य


 

First Published on: May 8, 2020 11:41 PM
Exit mobile version