घरताज्या घडामोडीCoronaVirus: चीनमधील वुहान शहरातून कोरोना व्हायरस पसरला, WHOने केले मान्य

CoronaVirus: चीनमधील वुहान शहरातून कोरोना व्हायरस पसरला, WHOने केले मान्य

Subscribe

संपूर्ण जग कोरोना व्हायरस चीनमुळे पसरला आहे असा आरोप करत आहे. चीनने स्वार्थीपणामुळे कोरोनाबाबत संपूर्ण जगाला अंधारात ठेवले आहे, असे म्हटले जात आहे. तरीदेखील जागतिक आरोग्य संघटना चीनची बाजू घेत आहे, असा देखील त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने चीनमधील वुहान शहरातील मार्केटमधून कोरोना व्हायरस पसरला असल्याचे मान्य केले आहे. त्यांनी या दिशेने अधिक संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनचे फूड सेफ्टी ज्युनॉटिक व्हायरस तज्ञ डॉ. पीटर बेन ऐंबरेक म्हणाले की, ‘कोरोना व्हायरस वुहान शहरातील मार्केटमधून पसरला आहे हे स्पष्ट आहे. नेमकी भूमिका काय हे आम्हाला माहित नाही. हा कोरोनाचा स्त्रोत आहे की इथून तो पसरला, की योगायोगाने काही रुग्ण मार्केटमध्ये आणि जवळपास आढळले.’ चीनने जानेवारीमध्ये कोरोनाचा फैलाव होऊन नये म्हणून मार्केट बंद केले होते.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, जिवंत प्राण्यामुळे की संक्रमण झालेल्या दुकानदारमुळे किंवा ग्राहकांमुळे मार्केटमध्ये कोरोना व्हायरस पसरला हे देखील स्पष्ट नाही. तसेच यावेळेस अमेरिकेने चीनवर केलेल्या आरोपावर पीटर यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. ते म्हणाले की, ‘मेर्स व्हायरस उंटामुळे झाला हे शोधण्यासाठी संशोधनकांना एक वर्ष लागले. अजून उशीर झालेला नाही.’ २०१२ मध्ये सौदी अरबमध्ये मेर्स व्हायरसच्या जाळ्यात अडकला होता. उंटाच्या माध्यमातून हा व्हायरस मनुष्यांमध्ये पसरला होता.


हेही वाचा – LockDown Effect: बेरोजगारीमुळे शेकडो शेफ रस्त्यावर, जॅकेट फेकून व्यक्त केला निषेध

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -