Lok Sabha 2024 : भारतमाता की जय म्हणण्यासाठी घेतली परवानगी? काय आहे प्रकरण, वाचा

Lok Sabha 2024 : भारतमाता की जय म्हणण्यासाठी घेतली परवानगी? काय आहे प्रकरण, वाचा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा जोरदार प्रचार सुरू आहे. एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सावदी नवीन वादात सापडले आहेत. भारतमाता की जय म्हणण्यासाठी त्यांनी चक्क स्टेजवर उपस्थित काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची परवानगी घेतली. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते आहे. (Lok Sabha Election 2024 congress mla seeks permission from mallikarjun kharge to chant bharat mata ki jai slogan)

कर्नाटकमधील कलबुर्गी येथे शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची एक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत भारतमाता की जय म्हणण्यासाठी एका काँग्रेस आमदाराने खर्गे यांची परवानगी घेतली. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आणि ही संधी साधत भाजपाने तात्काळ काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : गरीब महिलांना एक लाख रुपये देणार; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ग्वाही

नेमकं प्रकरण काय?

या कार्यक्रमादरम्यान, अथानी येथील काँग्रेस आमदार लक्ष्मण सावदी रॅलीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. शेवटी ते म्हणाले की, आता मी भारतमाता की जय म्हणेन, आणि तुम्ही सर्वांनी माझ्या मागे ही घोषणा द्यायची आहे. खर्गे यांना याची काही अडचण वाटत असेल असं मला वाटत नाही, असे सावदी म्हणाले. (Lok Sabha Election 2024 congress mla seeks permission from mallikarjun kharge to chant bharat mata ki jai slogan)

भाजपाने केली टीका

कर्नाटक भाजपाचे अध्यक्ष बिवाई विजयेंद्र यांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. देशभक्ती व्यक्त करण्यासाठी देखील वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागणे, हे दुर्दैवी आहे. याउलट भाजपात राष्ट्रवाद जपला जातो. विजयेंद्र म्हणाले, लक्ष्मण सावदी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला व्यासपीठावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची परवानगी घ्यावी लागणे हे दुर्दैवी आहे. भारतमाता की जय म्हणण्यासाठी एवढा संकोच कसला? आपले देशप्रेम व्यक्त करताना एका काँग्रेस नेत्याला अपराधी वाटते, आणि यासाठी तो पक्ष प्रमुखाकडे परवानगी मागतो, हे चांगले लक्षण नसल्याचे विजयेंद्र म्हणाले.

हेही वाचा – BJP Star Campaigner : एकनाथ शिंदे, अजित पवार आता भाजपाचे स्टार प्रचारक नाहीत; काय आहे कारण?

कर्नाटकातील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी देखील या प्रकरणावर टीका केली आहे. (Lok Sabha Election 2024 congress mla seeks permission from mallikarjun kharge to chant bharat mata ki jai slogan)

First Published on: April 13, 2024 10:20 PM
Exit mobile version