घरमहाराष्ट्रBJP Star Campaigner : एकनाथ शिंदे, अजित पवार आता भाजपाचे स्टार प्रचारक...

BJP Star Campaigner : एकनाथ शिंदे, अजित पवार आता भाजपाचे स्टार प्रचारक नाहीत; काय आहे कारण?

Subscribe

Lok Sabha Election : भारतीय जनता पार्टीने आपल्या यादीत बदल केला आहे आणि नवीन यादी निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. विशेष म्हणजे, बदल करण्यात आलेल्या या नवीन यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे नाहीत.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरू झाले आहेत. प्रत्येक पक्ष पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी उतरतो आहे. प्रचारासाठी प्रत्येक पक्षाने आपापले स्टार प्रचारक निवडले आहेत, त्याची यादी देखील निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहे. मात्र, भारतीय जनता पार्टीने आपल्या यादीत बदल केला आहे आणि नवीन यादी निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. विशेष म्हणजे, बदल करण्यात आलेल्या या नवीन यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे नाहीत. (Lok Sabha Election 2024 bjp remove cm eknath shinde and deputy cm ajit pawar from list of star campaigners in maharashtra)

नवीन यादीत कोण?

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून ही नवीन यादी दिली आहे. अन्य बदलांसह नवीन यादी येईतो महाराष्ट्रातील चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी ही आमची अंतिम यादी आहे, असे पत्र सिंह यांनी राजीव कुमार यांना दिले आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या या नवीन यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 जणांची नावे आहेत. विशेष म्हणजे, या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे नाहीत. यापूर्वीच्या यादीत त्यांची नावे होती. मात्र, आता ती वगळण्यात आली आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून फुटून वेगळ्या झालेल्या गटाचे प्रमुख आहेत तर अजित पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून वेगळ्या झालेल्या गटाचे प्रमुख आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : भाजपाचे नेतृत्व ही भुताटकी, पंतप्रधानांबद्दल बोलताना राऊतांची जीभ घसरली

यादीत बदल कशामुळे?

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांचा समावेश होता. याविरोधात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. इतर पक्षांच्या नेत्यांची नावे आपल्या यादीत समाविष्ट करून भाजपाने आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असा आक्षेप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने घेतला होता. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राष्ट्रीय पक्षांना 40 स्टार प्रचारक नेमण्याची परवानगी आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात मतदान कधी?

महाराष्ट्रातील 48 लोकसभांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मुंबईमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -