Lok Sabha 2024 : रायबरेली आणि अमेठीतील काँग्रेस उमेदवार कोण? अँटनी यांनी दिले संकेत

Lok Sabha 2024 : रायबरेली आणि अमेठीतील काँग्रेस उमेदवार कोण? अँटनी यांनी दिले संकेत

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज महाराष्ट्रात

तिरुवनंतपुरम : काँग्रेस नेते राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवतील, असे संकेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी बुधवारी दिले. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या दोन महत्त्वाच्या जागांबाबत आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर अँटनी यांनी हे वक्तव्य केले आहे. (Lok Sabha Elections 2024: Hints from AK Antony on Amethi and Raebareli)

अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून काँग्रेस कोणाला निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत, याची सर्व वाट पाहात आहेत. पण त्याबाबत कोणी अंदाज व्यक्त करू नये. गांधी कुटुंबातील एक सदस्य उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवणार आहे, असे ‘एशियानेट न्यूज’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अँटनी यांनी सांगितले. देशातील धर्मनिरपेक्ष पक्षांचा गांधी परिवारावर पूर्ण विश्वास आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : किमान गडकरींच्या मुलाचे तरी ऐका! व्हिडीओ शेअर करत अंधारेंचा मोदीभक्तांना टोला

दोनच दिवसांपूरवी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी अमेठीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. केवळ अमेठीतूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून मला सक्रिय राजकारणात यावे, असे आवाहन केले जात आहे. अमेठीबाबत अशी मोठ्या प्रमाणावर भूमिका घेतली जात आहे, कारण मी 1999पासून तेथे प्रचार केला आहे आणि आता पोस्टर्सही लावण्यास सुरुवात झाली आहे, असे वाड्रा यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर, रॉबर्ट वाड्रा हे उमेदवार असतील का, असे विचारले असता माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी, तसे होणार नसल्याचे संकेत दिले.

एकेकाळी गांधी घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची घोषण काँग्रेसने अद्याप केलेली नाही. अशा परिस्थितीत अँटनी यांनी हे संकेत दिले आहेत. यापूर्वी 8 एप्रिल रोजी काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी अमेठी आणि रायबरेली या जागांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा अद्याप न करण्यात आल्याबद्दल भाष्य केले होते. राजकारणात रणनीती आखली जाते आणि त्यानुसार योग्य वेळी घोषणा केल्या जातात. योग्य वेळ आल्यावर अमेठी आणि रायबरेली जागांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा केंद्रीय निवडणूक समितीकडून केली जाईल, असे त्यांनी म्हटले होते.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी यादी जाहीर; धुळे, जालन्यातील उमेदवार घोषित

First Published on: April 11, 2024 10:16 AM
Exit mobile version