घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी यादी जाहीर; धुळे, जालन्यातील उमेदवार...

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी यादी जाहीर; धुळे, जालन्यातील उमेदवार घोषित

Subscribe

आज बुधवारी (ता. 10 एप्रिल) काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून जालना लोकसभा आणि धुळे लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप काल मंगळवारी (ता. 09 एप्रिल) जाहीर करण्यात आले. त्यानुसार, काँग्रेसला 17 जागा देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आज बुधवारी (ता. 10 एप्रिल) काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून जालना लोकसभा आणि धुळे लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. जालन्यातून कल्याण काळे यांना तर धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जालन्यात आता दुहेरी रंगत पाहायला मिळणार असून कल्याण काळे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आपला प्रचार करणार आहेत. (Lok Sabha Election 2024 : Fourth list of Congress announced)

काँग्रेसचे कल्याण काळे यांना भाजपाच्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर, धुळ्यातून भाजपाच्या सुभाष भामरे यांच्याविरोधात शोभा बच्छाव निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच लढत पाहायला मिळणार आहे. परंतु, काँग्रेसकडून अद्यापही उत्तर मुंबई लोकसभेतून कोणालाही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. ज्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपाचा पेच कायम, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

महत्त्वाची बाब म्हणजे, मराठवाड्यातील एक लक्षवेधी मतदारसंघ असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघ हा राजकारणात सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. कारण जालन्यातून रावसाहेब दानवेंच्या विरोधात काँग्रेसने कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे. जालना हा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे या मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले आहेत. आता सहाव्यांदा ते लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव करणे हे कल्याण काळे यांच्यासमोरील मोठे आव्हान असणार आहे.

- Advertisement -

तर, कल्याण काळे हे माजी आमदार असून 2009 साली त्यांनी रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांचा केवळ 8 हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे यंदाच्या वेळी कल्याण काळे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून त्यांच्यासाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. त्यामुळे आता कल्याण आणि जालन्यातील उमेदवार जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील उत्तर मुंबई, मुंबई उत्तर मध्य आणि माढा या ठिकाणचे उमेदवार जाहीर होणे बाकी आहेत.

हेही वाचा… Election Commission : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही निवडणूक आयोग ठाम; इलेक्शन ड्युटी टाळणाऱ्या शिक्षकांवर कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -