घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : किमान गडकरींच्या मुलाचे तरी ऐका! व्हिडीओ शेअर करत...

Lok Sabha 2024 : किमान गडकरींच्या मुलाचे तरी ऐका! व्हिडीओ शेअर करत अंधारेंचा मोदीभक्तांना टोला

Subscribe

सारंग गडकरी यांच्या चौकसभेचा व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रभाकर परकला यांच्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे चिरंजीव स्वतः सांगत आहेत की, भाजपाला मत देऊ नका. आमचे नाही किमान गडकरी यांच्या मुलाचे तरी ऐका, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पहिला टप्प्याचे मतदान येत्या 19 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी रंगत चालली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ शेअर करत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाचे तरी ऐका, असा टोला मोदीभक्तांना लगावला आहे. (Lok Sabha Election 2024: Sushma Andhare Criticizes Modi Devotees With Reference To Nitin Gadkari’s Son)

लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा मोदी सरकार स्थापन झाले तर त्यानंतर कधीही निवडणुका होणार नाहीत, असा दावा अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी केले आहे. परकला प्रभाकर हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसने देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. खुशवंत सिंग लिटफेस्ट या कार्यक्रमात परकला प्रभाकर यांनी देशातील राजकीय पक्षांवर प्रश्न उपस्थित करत आजच्या नव्या भारताला राजकीय पक्षच जबाबदार असल्याचे सांगितले. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याव्यतिरिक्त केंद्रात दुसरे कोणाचेही चालत नसल्याचे, ते म्हणाले.

- Advertisement -

मोदी सरकार हुकूमशहा असून 2024 मध्ये पुन्हा सत्तेत आल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल, असे सांगून ते म्हणाले की, मोदी सरकार ब्रँडिंगवर काम करत आहे. ते 80 टक्के रक्कम ब्रँडिंगवर खर्च करते. बेटी बचाओ बेटी पढाओमध्ये केवळ मोदींचे ब्रँडिंग करण्यात आले. इतर पक्षही आता याचे अनुकरण करत आहेत. एखादी योजना दाखवण्यासाठी मोदी सरकार देशभरात बॅनर आणि होर्डिंग्ज लावते, त्यात फक्त मोदीच असतात.

- Advertisement -

हाच संदर्भ देत सुषमा अंधारे यांनी ट्वीट केले आहे. प्रभाकर परकला यांच्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे चिरंजीव सारंग गडकरी हे स्वतः सांगत आहेती की, भाजपाला मत देऊ नका. आमचे नाही किमान गडकरी यांच्या मुलाचे तरी ऐका, असा टोला त्यांनी मोदीभक्तांना लगावला आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी यादी जाहीर; धुळे, जालन्यातील उमेदवार घोषित

काय आहे व्हिडीओमध्ये?

नागरपूरमधील एका चौकसभेमध्ये सारंग गडकरी बोलताना दिसत आहेत. 2014मध्ये ही जागा भाजपाची नव्हती. त्यावेळी भाजपामुळे ही जागा मिळालेली नव्हती आणि आताही ही जागा भाजपामुळे जिंकता येणार नाही, असे सांगतानाच, तुम्ही पक्षाला नव्हे तर, माणुसकीला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपाचा पेच कायम, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -