Election Result National Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विक्रमी विजय

Election Result National Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विक्रमी विजय

पंतपधान नरेंद्र मोदी

सतराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. देशभरात ११ एप्रिल पासून मतदानाला सुरुवात झाली होती. यावर्षी एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. त्यापैकी पहिला टप्पा ११ एप्रिल रोजी संपन्न झाला. मतदानाचा ११ एप्रिल पासून सुरु झालेला हा प्रवास १९ मे रोजी संपला. १९ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा पार पडला. आज म्हणजे २३ मे रोजी या सर्व मतदानाचा निकाल लागणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून देशभरातील मतमोजनीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरेल का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. या निकालात सर्वात महत्त्वाची भूमिका देशातील ‘हिंदी भाषिक पट्टा’ बजावणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड या राज्यांमध्ये जो पक्ष अथवा राजकीय आघाडीला जास्त जागा मिळणार त्याची सत्ता दिल्लीत येणार हे नक्की आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत या हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे देशात भाजपची सत्ता आली होती. आज येणार्‍या निकालाकडे म्हणूनच सर्व देशाचे लक्ष लागले आहे.  
A view of the sea
Chetan Patil

सोनिया गांधी रायबरेलीतून विजयी

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.

Chetan Patil

मोदींचे अभिनंदन – प्रियंका गांधी

काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकांच्या निर्णयाचे स्वागत आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. याशिवाय त्यांनी मोदींचे अभिनंदन केले आहे.

Chetan Patil

बांग्लादेशच्या पंतप्रधान हसिना यांच्या मोदींना शुभेच्छा

बांग्लादेशच्या पंतप्रधान हसिना शेख यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

Bangladeshi PM Sheikh Hasina has sent a congratulatory message to PM Narendra Modi. #electionresults2019 (file pic) pic.twitter.com/DpfOkOkmRf
— ANI (@ANI) May 23, 2019
Chetan Patil

राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारली असून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव पक्षाकडे दिला आहे. याविषयी काँग्रेसच्या कार्यकारणीत लवकरच चर्चा होईल, अशी माहिती सुत्रांकडून येत आहे.

Chetan Patil

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले मोदींचे अभिनंदन

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

I congratulate Prime Minister Modi on the electoral victory of BJP and allies. Look forward to working with him for peace, progress and prosperity in South Asia
— Imran Khan (@ImranKhanPTI) May 23, 2019
First Published on: May 23, 2019 7:53 AM
Exit mobile version