भगवान आणि अल्लाहला मी मानते, त्यांची पूजा करत राहीन; भाजपा नेत्या रुबी खान यांचे वक्तव्य

भगवान आणि अल्लाहला मी मानते, त्यांची पूजा करत राहीन; भाजपा नेत्या रुबी खान यांचे वक्तव्य

उत्तर प्रदेश राज्यामधील अलिगढ इथल्या भाजप नेत्या रुबी आसिफ खान यांनी नवरात्रीमध्ये गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या अशातच रुबी आसिफ खान यांनी पुन्हा एक वेगळेच विधान केले आहे आणि त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. ‘ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रबुद्ध संमेलनामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य हे अधिक बळकट झाले आहे. या संमेलनाला अनेक मुस्लिम नागरिकसुद्धा गेले होते. प्रभू श्रीराम हेच पैगंबर होते हे आता मुस्लिम समाजातील लोकांनाही कळू लागले आहे’. असे रुबी खान म्हणाल्या.

त्याच सोबत सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि योगी आदित्यनाथ यांच्या आगमनावेळी प्रबुद्ध संमेलनामध्ये मुस्लिम समाजातील लोकांनी जय श्री राम असे नारे दिल्याचेही रुबी आसिफ खान म्हणाल्या.

देशात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही आणि सर्वच जण एक आहेत असे इथल्या काही जणांना आता कळाले आहे. हा हिंदुस्तान आहे आणि इथे सर्वांना मिळूनमिसळून राहायला हवे. देशाचे नाव असेच पुढे जात राहले पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी कट्टरपथींच्या निशाण्यावर मी नेहमीच राहिले आहे. पण मी त्यांना कधीच घाबरणार नाही” असेही रुबी खान म्हणल्या आहेत.

मी भगवान आणि अल्लाहला मानते आणि यापुढेही असाच नमाज पठण आणि पूजा करत राहीन. याआधीही माझ्याविरोधात फतवे जारी केले गेले होते आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली होती. मला आणि माझ्या कुटुंबीयांना काहीही होऊ शकते. याची लेखी तक्रारही मी दिली आहे आहे. असे असतानाही माझ्या कुटुंबीयांना आजवर कोणतीही सुरक्षा देण्यात आलेली नाही. असेही रुबी आसिफ खान म्हणाल्या.


हे ही वाचा – गुजरातमध्ये फोडाफोडीचं राजकारण, भाजपाच्या माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

First Published on: November 28, 2022 3:39 PM
Exit mobile version