LPG गॅस सिलेंडरचे भाव वधारला,73.5 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर

LPG गॅस सिलेंडरचे भाव वधारला,73.5 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर

सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आता पुन्हा कात्री लागली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ केल्याचे समोर आले आहे.सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 73.5 रुपये प्रति सिलेंडर इतकी वाढ केल्याची माहिती समोर येत आहे. याचप्रमाणे यंदा घरगूती गॅस सिलेंडरचे दर या महिन्यात स्थिर असल्याचे कळतेय. या दरवाढीनंतर दिल्लीत 19 किलोच्या कमर्शिअल गॅसचा दर 1500 रुपयांवरुन वाढून तब्बल 1632 रुपये प्रति सिंलेडर झाल्याने महागाईत आणखी भर पडली आहे.तसेच 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर इतकाच असणार आहे. जुलैमध्ये ऑईल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात 25.50 रुपये प्रति सिलेंडरची वाढ केली होती. या वाढीनंतर विवध राज्यात विना सब्सिडीच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत काहीशी वाढ झाली होती. दिल्लीमध्ये 834.50 रुपये होती तर या महिन्यात सुद्धा हाच दर असणार आहे. कोलकातामध्ये 14.2 किलोच्या सिलेंडरचा दर 861 रुपये आहे. तर मुंबईत 834.50 रुपये आहे.

19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरचे नवे दर

14 किलोच्या गॅस सिलेंडरचे दर पुढीलप्रमाणे

अशी तपासा LPG गॅस सिलेंडरचे किंमत

LPG गॅस सिलेंडरच्या किंमती दर महिन्याच्या सुरूवातीला बदलत असतात. सरकारी तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल करत असतात. जर तुम्हाला सिलेंडरची किंमत जाणून घ्यायची असेल तर तेल कंपन्यांच्या संकेतस्थळावर भेट देऊन जाणून घेता येतील. तेल कंपन्या दरमहा त्यांच्या संकेतस्थळावर सिलेंडरचे दर जारी करत असतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तुमच्या शहरातील गॅसच्या किंमती जाणून घेऊ शकतात.


हे हि वाचा –दहा राज्यात कोरोनाचा प्रकोप; केंद्र सरकारने दिल्या कडक उपाययोजना करण्याच्या सूचना

First Published on: August 1, 2021 12:51 PM
Exit mobile version