‘महालक्ष्मी सरस’ने गाठला १५ कोटींच्या उलाढालीचा टप्पा

‘महालक्ष्मी सरस’ने गाठला १५ कोटींच्या उलाढालीचा टप्पा

‘महालक्ष्मी सरस’ने गाठला १५ कोटींच्या उलाढालीचा टप्पा

‘महालक्ष्मी सरस’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती भरपूर शॉपिंग, आणि खाऊगिरी. यावर्षीच्या प्रदर्शनात देखील राज्यभरातून आलेल्या बचत गटांचे असंख्य स्टॉल होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईकरांसाठी महालक्ष्मी सरस पर्वणीच ठरली. दरम्यान, महालक्ष्मी सरसने यावर्षी १५ कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला आहे. महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन १७ जानेवारीपासून बीकेसी येथे भरवण्यात आले होते. महाराष्ट्रातील २९ राज्यांमधून विविध उत्पादने, कला घेऊन स्वयंसहाय्यता गट तसेच ग्रामीण कारागीर सहभागी झाले होते.

महालक्ष्मी सरस या प्रदर्शनातून मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून दिली जाते. ग्रामविकास विभागातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून पुढच्या वर्षी प्रदर्शनात स्टॉलची संख्या वाढवली जाणार आहे. तसेच, यावर्षी जवळपास १५ कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा या प्रदर्शनाने गाठला, अशी माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.

२९ राज्यांमधून स्वयंसहाय्यता गटांचा सहभाग –

मागील दीड दशकात महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अंदाजे ८ हजार स्वयंसहाय्यता समुहांनी मुंबईकरांना सेवा दिली आहे. पहिल्यावर्षी ५० लाखाची आर्थिक उलाढाली झाली होती तर यावर्षी जवळपास १५ कोटींच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा  गाठला आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील २९ राज्यांमधून विविध उत्पादने, कला घेऊन स्वयंसहाय्यता गट तसेच ग्रामीण कारागीर सहभागी झाले होते.

सिताफळ रबडी, रागी कुकीज,हातसडीचा तांदुळ ठरले आकर्षण

प्रदर्शनात यावर्षी सिताफळ रबडी, आंबाडीचे ज्युस, रागी कुकीज हे ग्राहकांचे आकर्षण ठरले. तसेच जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी आणि तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा – पांढरा रस्सा, सोलापूरची शेंगाचटणी, राज्यातील विविध भागातील मसाले, हातसडीचा तांदुळ, गोंदिया जिल्ह्यातील महिलांनी शोधून काढलेला एलईडी बल्ब, कोल्हापुरी चप्पल आदींची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. यावर्षी गावातील महिलांच्या शेतकरी उत्पादक संघांनी गावातील भाजीपाला, चिकन आणि मटनाचा पुरवठा केला ही नाविन्यपूर्ण बाब होती.

First Published on: January 30, 2020 9:15 PM
Exit mobile version