Live Update: १५ ऑगस्ट पासून २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची सुविधा मिळणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Live Update: १५ ऑगस्ट पासून २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची सुविधा मिळणार-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Live update Mumbai Maharashtra

मुंबईकरांसाठी १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास सुरु, लसीचे २ डोस घेतल्यांसाठी लोकल प्रवास सुरु-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नीरज चोप्राचा सत्कार करणार, नीरज चोप्राने भारतीयांची मान उंचावली, ऑलिम्पिकमधील विजेत्यांनी पदक विजेत्यांचा अभिमान कोरोनाच्या लाख लाट येत जात आहेत. राज्यावर कोविडसह नैसर्गिक संकटाचं वादळ, महापुराच्या काळात प्रशासनाने चांगल काम केलं, पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धोकादायक वस्त्यांचे पुर्नवसन करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्राने OBC आरक्षणासाठी एम्पेरिकल डेटा द्यावा, आरक्षणाची ५० टक्क्यांची अट शिथील करावी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाची लाट संपलेली नाही, संसर्ग थोपवण्यासाठी नियमांचे पालन करावेच लागेल, गेल्यावर्षी सण, उत्सवांनंतर दुसरी लाट आली- मुख्यमंत्री पुरग्रस्त ६ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली ,सातारा, पुण्यात धोका अधिक, डेल्टा व्हेरियंटचा धोका अधिक वाढतोय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लसींचे २ डोस घेतलेल्यांना मुभा देण्यासंदर्भात विचार सुरु, मात्र यासाठी ७ ते ८ दिवस लागण्याची शक्यता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
फडणवीसांसह दरेकर दिल्लीत दाखल, उद्या भाजप खासदार आमदारांची होणार बैठक, अमित शहांची भेट घेण्याची शक्यता,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री ८ वाजता सोशल मीडियावरून राज्यातील जनतेला संबोधित करणार मुख्यमंत्री आज रात्री ८.३० वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. त्यामुळे आज मुख्यमंत्री नेमकं कोणत्या मुद्द्यावर संवाद साधतील याची उत्सुकता सर्वांना आहे. राज्यात निर्बंध शिथिल होणार का? या संदर्भात सर्वांनाच उत्सुकता

पुण्यातल्या निर्बंधात मोठी शिथिलता, शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार


रेल्वे, मॉल्स, हॉटेल्सविषयी उद्या निर्णय होण्याची शक्यता रेल्वे, मॉल्स, हॉटेल्सविषयी उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील संपूर्ण निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर पालिका अंमलबजावणी करणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
उद्या सकाळी ११ वाजता नायगाव वसाहतीतील नागरिक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेणार.
कुर्ला ते टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला, हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल
देशात गेल्या २४ तासात ३९ हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे तर यादरम्यान, ४३ हजरांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४९१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
अकोल्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मखराम पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८४ वर्ष होते. मुंबईतील लीलावती रूग्णालयात उपचारादरम्यान रात्री दीड वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मखराम पवार प्रकाश आंबेडकरांचे माजी सहकारी होते. आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’च्या यशस्वीतेतील ते महत्त्वाचे शिलेदार होते. बहुजन महासंघाचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने (एनआयए) आतापर्यंतची मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी निधी पुरवठा प्रकरणी एनआयएने जम्मू काश्मीरमधील १४ जिल्ह्यांमध्ये धाड टाकली आहे. एकूण ४५ ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांच्या ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने एनआयएकडून ही कारवाई केली जात आहे.
पुण्यातील एका गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत १४ बस जळून खाक झाल्या, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास कोपरे गावातील खाजगी बस गोडाऊनमध्ये आग भडकल्याची माहिती आहे. पुण्यातील उत्तमनगर भागातील कोपरे गाव येथे बस दुरुस्ती करणारे मोठे गॅरेज आहे. पुणे आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. पहाटेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडला यश आले.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेच सुटण्याची शक्यता आहे. राज्यांना ओबीसीची यादी ठरवण्याचा अधिकार मिळणार. केंद्र सरकार १२७ व्या घटनादुरूस्तीच्या तयारीत. यासंदर्भातील विधेयक लवकरच लोकसभेत मांडण्यात येणार आहे. दरम्यान, विधेयक मंजूर झाल्यास महाराष्ट्राटा मोठा विजय असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कळवा पूर्व येथील इंदिरानगरातील माँ काली चाळीवर शनिवारी रात्री दरड कोसळली. त्यात सहा घरांचे नुकसान झालं आहे. तर २५ घरातील कुटुंबांचं तातडीने स्थलांतर करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या दरडीत माँ काली चाळीतील बाबू शेख, सागर चतुर्वेदी, भारती, दशरथ लाल कोरी,अशोक विश्वकर्मा आणि कन्हैया विश्वकर्मा यांच्या घरावर शनिवारी रात्री पडली आहे. घटनेची माहिती मिळताच, कळवा पोलीस,ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली होती.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क मंत्री वीरेंद्र कुमार यांनी ७ ऑगस्ट रोजी ‘पीएम-दक्ष पोर्टल आणि अॅप’ लाँच केलं. मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि सफाई कर्मचाऱ्यांकरता कौशल्य विकास योजना सुलभ करण्यासाठी हे अॅप सुरु करण्यात आलं आहे. ‘पंतप्रधान दक्ष आणि कुशल संपन्नता हितग्राही (पीएम-दक्ष) योजना’ सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाकडून २०२०-२१ पासून लागू करण्यात येणार आहे.
First Published on: August 8, 2021 8:29 PM
Exit mobile version