महात्मा गांधींची आज १५३ वी जयंती, पंतप्रधान मोदींनी भारतीयांना केले महत्त्वाचे आवाहन

महात्मा गांधींची आज १५३ वी जयंती, पंतप्रधान मोदींनी भारतीयांना केले महत्त्वाचे आवाहन

नवी दिल्ली – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघट येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. तसेच, बापूंना श्रद्धांजली वाहण्यापूर्वी पीएम मोदींनीही ट्विट केले. ट्विट करून त्यांनी यावेळी यंदा गांधी जयंती खूप खास असल्याचे सांगितले. गांधी जयंतीचे महत्त्वही त्यांनी लोकांना सांगितले.

हेही वाचा – कानपूरमध्ये काळी रात्र! दोन अपघातात ३२ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनीही व्यक्त केला शोक

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासाठी श्रद्धांजलीपर ट्विटही केले. गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधींना श्रद्धांजली, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. ही गांधी जयंती आणखी विशेष आहे कारण भारत स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. मी जनतेला आवाहन करतो की, बापूंच्या आदर्शांचे पालन करावे. गांधीजींना श्रद्धांजली म्हणून मी तुम्हा सर्वांना खादी आणि हस्तकला उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन करतो.


पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही ट्विट करून आदरांजली वाहिली. त्यांनी लिहिले की लाल बहादूर शास्त्री त्यांच्या साधेपणासाठी आणि निर्णायकतेसाठी संपूर्ण भारतात प्रशंसनीय आहेत. इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या काळात त्यांचे कणखर नेतृत्व सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

First Published on: October 2, 2022 9:07 AM
Exit mobile version