Makar Sankranti 2022 : सरकारने आयोजित केलेल्या सूर्य नमस्कार कार्यक्रमाला तब्बल 75 लाख लोकांची हजेरी

Makar Sankranti 2022 : सरकारने आयोजित केलेल्या सूर्य नमस्कार कार्यक्रमाला तब्बल 75 लाख लोकांची हजेरी

Makar Sankranti 2022 : सरकारने आयोजित केलेल्या सूर्य नमस्कार कार्यक्रमाला तब्बल 75 लाख लोकांची हजेरी

आज देशभरात मकरसंक्रातीच्या सण साजरा केला जात आहे. यंदा या मकरसंक्रातीचे औचित्य साधून आज वैश्विक सामूहिक सूर्य नमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देश-विदेशातील तब्बल 75 लाख लोकांनी हजेरी लावली. आयुष मंत्रालयाने ‘आजादी अमृत महोत्सव’ अंतर्गत अनेक देशांमध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सुर्यनमस्काराच्या आयोजित कार्यक्रमाला अनेक लोकांनी हजरी लावली असून,आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनीसुद्धा या कार्यक्रमाच्यावेळी सकाळी सूर्यनमस्कार घातले.

 

सोनोवाल म्हणाले की, मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आम्ही सूर्यनमस्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देश-विदेशातील सुमारे 75 लाख लोक सहभागी झाल्यामुळे या कार्यक्रमाची सांगता चांगल्याप्रकारे झाली.

सोनोवाल यांनी बुधवारी 13 जानेवारीला आभासी पत्रकार परिषदेत सांगितले की,सूर्यनमस्कारामुळे चैतन्य निर्माण होते याशिवाय रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. त्यातच आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचेच झाले आहे. त्यामुळे आयुष मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

काय आहेत सूर्यनमस्काराचे फायदे ?

आजकाल फिटनेसप्रति सजगता वाढतेय. बॉलिवूडच्या बलदंड नायक आणि सुकुमार नायिकांचा आदर्श समोर ठेवत बरेच जण व्यायामाकडे वळताहेत. शरीर फिट अ‍ॅण्ड फाईन ठेवण्यासाठी वर्कआऊट, डाएटिंग आदींची जोरदार तयारी करतात. मात्र साध्या सूर्यनमस्कारातूनही शरीराला परिपूर्ण व्यायाम मिळण्याची तजवीज आहे.नियमितपणे सूर्यनमस्कार घातल्यास फिटनेस राखणे सहज सुलभ होऊ शकते. या एका व्यायाम प्रकारात विभिन्न प्रकारच्या व्यायामांचे लाभ समाविष्ट आहेत. कुठल्याही वयाची व्यक्ती या व्यायाम प्रकाराने फिटनेस मिळवू शकते. यामध्ये बारा आसने आहेत. बारा आसने करताना बारा श्लोकांचे उच्चारण होते. योग्य प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार घातल्यास अत्यंत कमी अवधीत चांगले परिणाम दिसून येतात. सुरुवातीला एका वेळी तीन नमस्कार घालून नंतर संख्या वाढवली जाते.


हेही वाचा – Makar Sankranti 2022 : मकरसंक्रांतीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर फळभाज्या अन् पतंगांनी सजले


 

 

First Published on: January 14, 2022 10:02 AM
Exit mobile version