Video: राष्ट्राध्यक्षांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान तो अचानक दिसला विवस्त्र!

Video: राष्ट्राध्यक्षांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान तो अचानक दिसला विवस्त्र!

Video: राष्ट्राध्यक्षांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान तो अचानक दिसला विवस्त्र!

सध्या कोरोनाच्या संकटात अनेक मिटींग या झूमवर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून होत आहे. दरम्यान झूम व्हिडिओ कॉन्फरन्सवर ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यासोबत मिटींग असताना एक लाजिरवाणा प्रकार घडला. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये एक व्यक्ती त्याचा कॅमेरा बंद करायचा विसरला आणि ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसह १० जणांसमोर हा व्यक्ती चुकून विवस्त्र दिसला. यामुळे सध्या या कॉन्फरन्सचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

ब्राझीलमधील लॉकडाऊनच्या परिणामावर चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सवर सुरू होती. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसह उद्योगपती आणि काही अन्य महत्वाची लोक आणि साओ पाउलोचे उद्योग महासंघाचे अध्यक्ष पाउलो स्काफ यांना कॉन्फरन्सवर जोडले गेले होते. त्याच वेळेस एक व्यक्ती विवस्त्र दिसला. राष्ट्राध्यक्षांनी हे पाहताच म्हणाले की, त्या कोपऱ्यात एक व्यक्ती दिसत आहे, तो कॉन्फरन्स सोडून गेला आहे. तो ठिक आहे का?

काही वेळानंतर उद्योग मंत्री पाउलो गिड्स यांना सर्व प्रकरण समजले. ते म्हणाले की, ‘त्या ठिकाणी एक व्यक्ती अंघोळ करत आहे, कपड्यांशिवाय. तो कपड्यांशिवाय घरात आयसोलेट झाला आहे. त्याला या चर्चेमुळे खूप गरम झाले आहे म्हणून तो थंड पाण्याने अंघोळ करत आहे.’ यानंतर काही वेळात व्हिडिओ कॉन्फरन्स बंद करावा लागला.

खरंतर हा व्यक्ती कॉन्फरन्स सुरू असताना स्वतःचा कॅमेरा बंद करायला विसरला होता. अशा परिस्थितीत कॉन्फरन्समधील लोक त्याला पाहत आहे ते त्याला ठाऊक नव्हते. या कॉन्फरन्साचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


हेही वाचा – Lockdown Effect: स्विगी ११०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार


 

First Published on: May 18, 2020 5:14 PM
Exit mobile version