घरताज्या घडामोडीLockdown Effect: स्विगी ११०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Lockdown Effect: स्विगी ११०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Subscribe

स्विगीच्या सहसंस्थापकांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेटी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठविले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आजपासून चौथा लॉकडाऊनचा टप्पा सुरू झाला आहे. या लॉकडाऊनचा परिणाम अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांवर आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झाल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगीने सोमवारी जाहीर केले की, येत्या काही दिवसात १ हजार १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. स्विगीचे सहसंस्थापकांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेटी यांनी सोमवारी कंपनीतील कर्मचाऱ्यांना ई-मेला पाठवला आहे.

श्रीहर्ष मजेटी यांनी ई-मेलमध्ये लिहिले की, आज स्विगीसाठी दुःखाचा दिवस आहे. आम्हाला या कठीण आणि दुर्दैवी काळाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे १ हजार १०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करावे लागत आहे.

- Advertisement -

अलीकडेच झोमॅटोने १३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच जूननंतर पुढील सहा महिने कर्मचाऱ्यांचे वेतनात ५० टक्के कपात होणार असल्याचे झोमॅटोने जाहीर केले होते. कोरोनामुळे डिलिव्हरी व्यवसाय आणि ई-कॉमर्स जास्त काळ सुरू राहणार नाही असे अंदाज वर्तवले जात आहे.

चौथ्या लॉकडाऊनचा टप्पा ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या टप्प्यात आता सर्व ई-कॉमर्स वेबसाईटना अत्यावश्यक वस्तूंची डिलिव्हरी करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न कमी होत आहे. तसेच कर्मचाऱ्यांची देखील कपाती केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Samsung Galaxy A11 आणि A31 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -