मेट्रोचालकाच्या सावधानतेमुळे तरूणाला जीवनदान

मेट्रोचालकाच्या सावधानतेमुळे तरूणाला जीवनदान

मेट्रो रूळ ओलांडणारा तरूण (सौजन्य एएनआय)

दिल्ली मेट्रोचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

रेल्वे किंवा मेट्रोचो रूळ ओलांडू नका, अशा कितीही सुचना केल्या तरीही मुंबई दिल्लीसारख्या शहरांमधील नागरीक त्या सुचनांचे पालन करताना दिसत नाहीत. रूळ ओलांडताना अपघात होऊन दररोज कित्येक लोक जीव गमावतात. परंतु मंगळवारी दिल्ली मेट्रो* चालकाच्या सतर्कतेमुळे मेट्रो रूळ ओलांडणाऱ्या तरूणाचा जीव वाचला. अगदी शेवटच्या क्षणाला ब्रेक लाऊन मेट्रो थांबवल्याने तरूण बचावला. २१ वर्षीय मयूर पटेल हा तरूण दिल्लीच्या शास्त्रीनगर मेट्रो स्टेशनजवळ मेट्रोचे रूळ ओलांडत होता. मेट्रो सुरू झाल्यावरही तो रूळावरूनच चालत होता. परंतु चालकाने ब्रेक लावून मेट्रो थांबवली. पटेल आता सुखरूप आहे. काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.

सुखरूप बचावल्यानंतर मयूरला पोलिसांनी ताब्यात घेतले. रूळ ओलांडण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी कोणता मार्ग आहे? हे मला माहीत नसल्याने मी रूळ ओलांडला.

 

दररोज तब्बल २७ लाख प्रवासी दिल्ली मेट्रोने प्रवास करतात. दररोज घाईत असलेले, शॉर्टकट मारणारे अनेक प्रवासी रूळ ओलांडतात. मेट्रोचे रूळ ओलांडल्यास सहा महिने तुरूंगवास, ५०० रूपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा दिली जाते.

 

First Published on: May 23, 2018 8:19 AM
Exit mobile version