पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी तो चक्क पाण्यात झोपला!

पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी तो चक्क पाण्यात झोपला!

सौजन्य- मनोरमा मल्याळम

देवभूमी केरळमध्ये सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पूरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. काल जवानांनी केलेल्या मदत कार्यानंतर येथील एका इमारतीवर THANKS असा मेसेज लिहिण्यात आला आणि आता या मदतकार्यादरम्यानचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात महिलांना पाण्यातून रेस्क्यू बोटमध्ये बसवण्यासाठी एक मदतकर्ता चक्क गुडघ्यावर बसला आणि त्याच्या पाठीवर पाय देऊन महिला बोटीत चढतात.

रेस्क्यू ऑपरेशन टीमसाठी ‘थॅक्स’ मेसेज

काय आहे व्हिडिओ?

केरळमधील रेस्क्यू ऑपरेशनचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण यातील कोणत्याही व्हिडिओची आम्ही खात्री देत नाही. पण हा व्हिडिओ सध्या व्हॉटसअपवर फिरत आहे. हा व्हिडिओ केरळच्या रेस्क्यू ऑपरेशनचा एक भाग असल्याचे देखील म्हटले जात आहे.आणि एनडीआरएफने शेअर केल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक मात्र नक्की की, माणसाच्या मदतीला माणूसच सरसावताना दिसत आहे.

देवभूमीत हाहाकार

गेल्या एक आठवड्यापासून केरळला पावसाने झोडपून काढले आहे. अनेक नद्यांना पूर आल्यामुळे पाणी साचले आहे. आतापर्यंत मृताचा आकडा ४०० वर गेला आहे. NDRF,नौदलाच्या या साहाय्याने या ठिकाणी मदतकार्य सुरु आहे. शिवाय इस्रोच्या सॅटेलाईटच्या माध्यमातून पूरस्थितीवर अंतराळातून नजर ठेवली जात आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज देखील घेता येत आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या भागातून अनेकांचे रेस्क्यू करण्यात आले आहे. अनेक जण अद्यापही अडकले असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरु आहेत. अडकलेलयांसाठी आपात्कालीन मदत पाठवली जात आहे.

First Published on: August 21, 2018 12:27 PM
Exit mobile version