डुबत्या मुलाला वाचवण्यासाठी थांबवले

डुबत्या मुलाला वाचवण्यासाठी थांबवले

प्रातिनिधिक फोटो

अनेकांच्या जीवनात लग्न हे एकदाच होतात. लग्नाचा दिवस हा आयुष्यातील महत्वाचा दिवस मानला जातो. मात्र कोणाचे प्राण वाचवण्यासाठी नवरा लग्न मंडप सोडून गेला असले असे दृष्य फक्त सुपरहिरोंच्या चित्रपटातच पाहायला मिळते. मात्र मेक्सिको येथे अशा प्रकारची घटना खरोखर घडली आहे. एका समुद्रात १८ वर्षीय डुबत्या मुलाला वाचवण्यासाठी एका इसमाने स्वतःच्या लग्नाच्या मंडपातून धाव घेतली आहे. या मुलाला पाण्यातून काढून त्याने या मुलाचे प्राण वाचवले. या घटने नंतर जमलेल्या सर्वांनीच त्याचे कौतूक केले.

घटने विषयी सविस्तर माहिती

झॅक एडवर्ड्स (३७) असे या तरुणाचे नाव आहे. मेक्सिको येथील अलाबामाचे गल्फ स्टेट पार्क परिसरात त्याने आपला लग्न सोहळ्याचे आयोजन केल होत. आपली पत्नी सिंडी एडवर्ड्स आणि तिच्या कुटुंबीयांबरोबर फोटो काढत होता. या ठिकाणी बीच परिसर असल्यामुळे येथे अनेकजण पिकनीकसाठी आले होते. लग्न सोहळ्यादरम्यान मदतीच्या हाका झॅकला ऐकू आल्या. तसेच बीचवर जमलेल्या लोकांनी डूबत असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी मदतीची हाक मारली. झॅकच्या लक्षात आल्यानंतर त्याने आपला लग्न सोहळा थांबवत डुबत्या मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली. मुलाला वाचवण्यासाठी त्याने १५० फुट खोल असलेला समुद्रात उडी मारली. काही वेळाने झॅक या मुलाला पाण्या बाहेर घेऊन आला.

“डुबणाऱ्या मुलाकडे बघून त्याला वाचवण्याचा विचारच माझ्या डोक्यात प्रथम आला. आवाज ऐकून त्याला वाचवण्यासाठी मी शर्ट काढून धावलो. पहिला हा मुलगा ५० यार्ड दूर होता. पाण्याच्या प्रवाहाने हा मुलगा दूरजात होता. त्याला वाचवणे म्हत्वाचे होते म्हणून लग्न सोहळा सोडून मी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्याला वाचवून मला आनंदच झाला.”- झॅक

मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली तेव्हा झॅकची पत्नी सिंडीच्या मनात भिती निर्माण झाली होती. मात्र मुलाला वाचवून पती परत आल्यामुळे पत्नीचा जीव भांड्यात पडला.”जेव्हा झॅक मला सोडून पळत गेला तेव्हा माझ्या मानात खूप भिती होती. मला त्याला थांबवायचे होते मात्र मी माझ्या भावनांना आवर घातली. सुदैवाने झॅक परत आला आणि त्याने घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान आहे.”- सिंडी

First Published on: August 9, 2018 8:11 PM
Exit mobile version