हातोड्याने केलेल्या हल्ल्यात २० मुले जखमी, ३ मुलांची प्रकृती गंभीर

हातोड्याने केलेल्या हल्ल्यात २० मुले जखमी, ३ मुलांची प्रकृती गंभीर

शाळेचा फोटो

चीन मधील बिजिंग येथील एका प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या हल्ल्यात २० मुले जखमी झाली आहेत. यामधील ३ मुलांची प्रकृती गंभीर आहे. एका कामगाराने या मुलांना हातोड्याने मारले असल्याची माहिती चीन सराकारने दिली आहे. झुआनवु नॉर्मल स्कूलमध्ये हा प्रकार घडला. या घटनेमुळे शाळेतील मुलांमध्ये भितीचे वातावरण आहे. या कामगाराने सहा वर्गात जाऊन मुलांवर हातोड्याने वार केले. या घटनेनंतर लगेच पोलिसांना तक्रार करण्यात आली. काही वेळेनंतर या माथेफिरू कामगाराला अटक करण्यात आली. शाळा आपल्या कराराचे नूतनीकरण न केल्यामुळे शाळेला धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान जखमी मुलांवर उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कोण होता माथेफिरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक आरोपीचे नाव जिआ असे आहे. जिआ (४९) हा शाळेतील देखभाल कामगार (मेंटेनेन्स वर्कर) म्हणून कार्यरत होता. चीनच्या पूर्वोत्तर हेइलोंगजियांगचा हा रहिवाशी आहे. मागील काही महिने जिआ हा शाळेच्या देखभाल करण्याचे काम करत होता. मात्र शाळेने त्याला काम थांबवण्यास सांगितले. त्यावेळी रागात येऊन या माणसाने आपल्या जवळ असलेल्या हातोड्याने तोडफोड करण्यास सुरुवात केल. येवढेच करुन तो थांबला नाही तर त्याने शाळेतील वर्गामध्ये जाऊन मुलांना त्याच हातोडीने मारहाण केली. सदर बाब लक्षात येताच या माथेफिरूची शुटिंग करण्यात आली. चीनच्या व्ही चार्टवर हा व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र सरकारने काही वेळानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून घेतला होता. लहान मुलांवर झालेल्या हल्ल्यामुळे मुलांचे पालक यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पालकांना आता मुलांची काळजी वाटत आहे.

First Published on: January 8, 2019 9:00 PM
Exit mobile version