पुढची ‘मन की बात’ निवडणुकीनंतर; मोदींना सत्तेचा विश्वास

पुढची ‘मन की बात’ निवडणुकीनंतर; मोदींना सत्तेचा विश्वास

Mann ki Baat : अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी आज 'मन की बात' मधून देशवासियांना करणार संबोधित

आगामी लोकसभा निवडणुकीमुळे पुढील दोन महिने आम्ही सगळेच निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त राहणार आहोत. तसेच मी स्वत:ही या निवडणुकीत एक उमेदवार असणार आहे. त्यामुळे पुढची ‘मन की बात‘ निवडणुकीनंतर म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी असेल, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे तेच पुढचे पंतप्रधान असतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

आजची ‘मन की बात’ विशेष

‘आजची ‘मन की बात’ विशेष असणार आहे. हा कार्यक्रम चुकवू नका’ अशा प्रकारचे ट्विट पंतप्रधानांनी केल्याने ते काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

काय बोले मोदी ‘मन की बात’ विशेषमध्ये

आजच्या ‘मन की बात‘ विशेषमध्ये मोदींनी सुरुवातीलाच पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आपलं सशस्क्ष दल नेहमीच शौर्य गाजवत आले आहे. शांतता प्रस्थापित करण्याचे काम असो वा हल्लेखोरांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यायचे असो, आपले जवान सदैव सेवेशी तत्पर राहिले आहेत. आपल्या लष्कराने आता दहशतवाद आणि त्यांना ममदत करणाऱ्यांचा नायनाट करण्याचा संकल्प केलेला आहे, असे नमूद करत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा मोठ्या कारवाईचे संकेत दिले आहे.

शहीदांच्या देशभक्तीला मोदींचा सलाम

शहीद जवानांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या भावनांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी शहीदांच्या देशभक्तीला सलाम केला आहे. तसेच विजय सोरेंग या जवानाचं पार्थिव जेव्हा गुमला येथे पोहोचले तेव्हा त्यांच्या मुलाने देखील लष्करात जाणार, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. भागलापूरमधील शहीद रत ठाकून यांच्या वडिलांनीही देशभक्तीचा बाणा दाखलवला. अशाचप्रकरारे प्रत्येक शहीद जवानाच्या घरातून देशभक्तीचं जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येत असून हेच आपल्या देशाचं बलस्थान असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.


हेही वाचा – ‘मन की बात’ Vs काँग्रेसचा ‘अपनी बात राहुल के साथ’

हेही वाचा – मोदींची वर्षातील अखेरची ‘मन की बात’


 

First Published on: February 24, 2019 2:21 PM
Exit mobile version