घरमनोरंजन'मन की बात' नाही 'दिल की बात'

‘मन की बात’ नाही ‘दिल की बात’

Subscribe

शत्रुघ्न सिन्हा आपल्या वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी संजय खान यांच्या आत्मचरित्राच्या प्रदर्शनाच्यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर चांगलाचा निशाणा साधला आहे.

अभिनेता शत्रुघ्न सिन्हा नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. शत्रुघ्न सिन्हा हे केवळ अभिनेता नाहीत तर भारतीय जनता पार्टीचे नेतेही आहेत. मात्र असे असूनही त्यांना बर्‍याचदा मोदींविरुद्ध वक्तव्य करताना पाहिलं गेलं आहे. नुकतेच मुंबईमध्ये अभिनेता संजय खानच्या द बेस्ट मिस्टेक ऑफ माय लाईफ या ऑटोबायोग्राफीचे उद्घाटन झाले. यावेेळी शत्रुघ्न सिन्हा, फारूख अब्दुल्ला आणि अभिनेत्री हेमामालिनी यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमातही शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

मन की बातचे पेटंट

संजय खानच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्यावेळी शत्रुघ्न सिन्हा बोलायला उभे राहिल्यानंतर यावेळीदेखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता निशाणा साधला. आपले मित्र फारूख अब्दुल्ला यांनी आपल्याला स्टेजवर बोलावून मन की बात करायला सांगितले असल्याचे पहिल्यांदा शत्रुघ्न यांनी म्हटले. त्यानंतर हसून अरे मी तर मन की बात करू शकत नाही कारण ते कोणत्यातरी दुसर्‍या व्यक्तीचं पेटंट आहे. त्यामुळे मी दिल की बात आज करतो. दिल की बात…मित्रो फिर मित्रो अशा तर्‍हेने शत्रुघ्न सिन्हा यांनी कोपरखळी मारत आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांचा हा अंदाज बघून श्रोतेही हसायला लागले.

- Advertisement -

संजय खानच्या कष्टांविषयी काढले गौरवोद्गार

यावेळी संजय खानविषयीदेखील शत्रुघ्न सिन्हा यांनी गौरवोद्गार काढले. आपला समाज हा कलेचा आहे. संजय खानने या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी प्रचंड कष्ट केले आहेत. अत्यंत मेहनतीने संजयने स्वतःला सिद्ध केले. संजयने कष्ट तर भरपूर केले पण त्याने ना कधी चहा बनवला ना कधी चहा विकला. मात्र नेहमीच माझ्याबरोबर संजय खान राहिला आहे. असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. यामध्येही त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. याशिवाय आपण स्वतः संजय खानपासून प्रेरणा घेतल्याचंही त्यांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -