‘CMपद न सोडण्यासाठी पर्रिकरांवर भाजपचाच दबाव’

‘CMपद न सोडण्यासाठी पर्रिकरांवर भाजपचाच दबाव’

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मुख्यमंत्री पद सोडू नये यासाठी भाजपचाच दबाव असल्याचं गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख आणि गोव्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी म्हटलं आहे. गणेश उत्सवाच्या काळात पर्रिकर रूग्णालयामध्ये दाखल होते. त्यावेळी त्यांनी जबाबदारीतून मुक्त होण्याची तयारी दर्शवली होती. शिवाय, आपल्याकडील खाती देखील सोडण्यास आपण तयार असल्याचं म्हटलं होतं. पण, भाजप नेतृत्वानं त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यांना पदभार सोडण्यापासून परावृत्त केलं. ६२ वर्षीय मनोहर पर्रिकर सध्या गोव्यातील घरातून राज्याचा कारभार पाहत आहेत. आजारपणामुळे त्यांना ऑफिसला जाणं शक्य नाही. कॅन्सरसारख्या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांना यापूर्वी अमेरिकेला देखील हलवण्यात आले होते. पण, प्रकृतीमध्ये काही सुधारणा झाली नाही. त्यानंतर त्यांना मुंबई आणि दिल्ली येथे देखील उपचारासाठी हलवण्यात आले. पण, प्रकृतीमध्ये हवा तसा सुधार झाला नाही. अखेर त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोव्यातील घरी हलवण्यात आले. त्याठिकाणी पर्रिकर यांच्यावर उपचार सुरू असून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देखील मनोहर पर्रिकर सांभाळत आहेत.

वाचा – राजीनाम्यासाठी मनोहर पर्रिकरांच्या घरावर मोर्चा

यापूर्वी देखील भाजप मनोहर पर्रिकर यांच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप विरोधकांकडून झाला होता. शिवाय, मनोहर पर्रिकरांनी पदभार सोडावा यासाठी गोव्यातील काही संस्था आणि नागरिकांनी मोर्चा देखील काढला होता. त्यावेळी पर्रिकर यांना ४८ तासांचा अल्टिमेटम देत पूर्ण वेळ मुख्यमंत्री हवा अशी मागणी या मोर्चेकरांनी केली होती. त्यात आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मुख्यमंत्री पद सोडू नये यासाठी भाजपचाच दबाव असल्याचं गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख आणि गोव्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

वाचा – ‘भाजप सत्तेसाठी मनोहर पर्रिकरांच्या जिवाशी खेळतंय’

First Published on: November 23, 2018 10:04 AM
Exit mobile version