घरदेश-विदेशराजीनाम्यासाठी मनोहर पर्रिकरांच्या घरावर मोर्चा

राजीनाम्यासाठी मनोहर पर्रिकरांच्या घरावर मोर्चा

Subscribe

मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्यासाठी गोव्यात मोर्चा काढण्यात आला. यावेळ आक्रमक होत ४८ तासात मुख्यमंत्री बदला अशी मागणी गोवेकरांनी केली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना दिसून येत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजीनामा द्यावा आणि गोव्याला पूर्ण वेळ मुख्यमंत्री मिळावा अशी मागणी मंगळवारी संध्याकाळी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये करण्यात आली. मनोहर पर्रिकर यांच्या निवासस्थानी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ४८ तासांचा अल्टीमेटम देखील दिला आहे. काही एनजीओ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काढलेल्या या मोर्चाला राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे. सध्या प्रकृती अस्वास्थामुळं पर्रिकर घरातूनच राज्याचा गाढा हाकत आहेत. पोलिसांनी मात्र मनोहर पर्रिकरांच्या घरापासून १०० मीटर अंतरावर हा मोर्चा अडवला. त्यामुळे आगामी काळात मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी वाढताना दिसणार आहे.

वाचा – ‘भाजप सत्तेसाठी मनोहर पर्रिकरांच्या जिवाशी खेळतंय’

घरूनच हाकतात कारभार

मनोहर पर्रिकर सध्या कॅन्सरनं ग्रस्त आहेत. त्यामुळे उपचारासाठी त्यांना अमेरिकेला देखील हलवण्यात आलं होतं. पण अमेरिकेहून परतल्यानंतर त्यांची तब्येत पुन्हा खालावली. त्यामुळे त्यांना मुंबई आणि दिल्लीतील एम्स या रूग्णालयामध्ये हलवण्यात आलं. अखेर डॉक्टरांनी त्यांच्यावर घरी उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मनोहर पर्रिकर यांच्यावर सध्या गोव्यातील घरी उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीमध्ये सध्या सुधारणा होत असून लवकरच पर्रिकर पूर्णपणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतील असं भाजपनं सांगितलं आहे. यापूर्वी देखील सत्ता गमवण्याच्या भीतीनं भाजप मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा बळी देत असल्याचा आरोप केला गेला होता. शिवाय, विरोधकांकडून देखील मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामध्ये आता काही सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी देखील उडी घेत मुख्यमंत्री बदलाची मागणी केली आहे. त्यामुळे आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

वाचा – मनोहर पर्रिकरांची प्रकृती स्थिर; गोव्यात नेतृत्व बदल नाहीच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -