१ एप्रिलपासून तुमच्या आयुष्यात ‘हे’ बदल होणार

१ एप्रिलपासून तुमच्या आयुष्यात ‘हे’ बदल होणार

१ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होते. या दिवसापासून वेगवेगळे कायदे बदलतात. त्यामुळे यावर्षीही १ एप्रिलपासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. बरेच नियम येणार आहेत. या नियमंविषयी माहिती तुम्हाला होणे जरुरीचे आहे. हे बदल तुमची नौकरी, पॅन कार्ड, प्रॉपर्टी, जीएसटी, बँक, ईपीएफ संदर्भात असणार आहेत.

पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक कराच

जीएसटी संदर्भात महत्त्वाचे नियम १ एप्रिल पासून बदलण्यात येणार आहेत. यामध्ये कंपोजिशन स्कीम आणि रियल इस्टेटच्या स्वस्त दरांचा समावेश आहे. त्याचबरोबर पॅनकार्ड आणि आधारकार्डला लिंक केल्याशिवाय तुम्हाला टॅक्स रिफंड मिळणार नाही. यासोबतच रिझर्व्ह बॅंकेच्या व्याजदरासंदर्भात महत्त्वाचे निर्णय लागू होणार आहेत. सेबी म्युचूअल फंड संदर्भात महत्त्वाचे निर्णय १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार म्युच्यूअल फंड कंपन्या ग्राहकांकडून फंड मॅनेज करण्यासाठी जो चार्ज लावतात त्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

१ एप्रिलपासून लागू होणारे महत्त्वाचे निर्णय

First Published on: March 22, 2019 3:59 PM
Exit mobile version